ETV Bharat / city

BEST Service for New Metro Routes : मेट्रोच्या दोन नवीन मार्गावर जाण्याकरिता बेस्टकडूनही सेवा होणार सुरू

मेट्रो २ ए मार्ग ( Metro 2A route ) दहिसर ते डहाणूकरवाडी तर मेट्रो ७ ( Metro 7 route ) मार्ग दहिसर ते आरे दरम्यान आहे. या मेट्रो मार्गावर कांदिवली पश्चिम ते बंदर पाखाडी तसेच आरे मेट्रो स्थानक ते शिवशाही प्रकल्प ( Aarey metro to Shivshahi project असे दोन नवीन मार्ग असणार आहेत. कांदिवली स्थानक पश्चिम ते बंदर पाखाडी गाव या दरम्यान नवीन बसमार्ग २७४ सुरू ( Bus route 274 ) करण्यात येणार आहे.

बेस्ट
बेस्ट
author img

By

Published : Apr 1, 2022, 8:00 PM IST

मुंबई - उद्या (२ एप्रिल) गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या हस्ते पश्चिम उपनगरात मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ हे दोन नवीन मार्ग सुरू होणार आहेत. या नवीन मेट्रोमार्गावरील प्रवाशांना घरी आणि कामावर जात यावे यासाठी बेस्टने नवीन दोन मार्ग सुरू केले आहेत. तसेच या मेट्रो स्थानकावरील बेस्ट बस थांब्यावरून नियमित बस मार्ग सुरु राहणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

मेट्रो २ ए साठी बसमार्ग -मेट्रो २ ए मार्ग ( Metro 2A route ) दहिसर ते डहाणूकरवाडी तर मेट्रो ७ ( Metro 7 route ) मार्ग दहिसर ते आरे दरम्यान आहे. या मेट्रो मार्गावर कांदिवली पश्चिम ते बंदर पाखाडी तसेच आरे मेट्रो स्थानक ते शिवशाही प्रकल्प ( Aarey metro to Shivshahi project ) असे दोन नवीन मार्ग असणार आहेत. कांदिवली स्थानक पश्चिम ते बंदर पाखाडी गाव या दरम्यान नवीन बसमार्ग २७४ सुरू ( Bus route 274 ) करण्यात येणार आहे. ही बस मेट्रो २ ए च्या डहाणूकरवाडी स्थानकामार्गे जाईल.

बसमार्गावरील बस कांदिवली स्थानक (पश्चिम), देना बँक, काळा मारुती मंदिर, महात्मा गांधी तरण तलाव, कांदिवली गाव, डहाणूकरवाडी मेट्रो स्थानक, कामराज नगर, नेताजी नगर पब्लिक स्कुल मार्गे बंदरपाखाडी गाव अशी जाईल. कांदिवली स्थानकातून पहिली बस ६ वाजता सुटणार आहे. शेवटची बस रात्री ९.४५ वाजता सुटेल. तर बंदर पाखाडीहून पहिली बस सकाळी ६.१५ वाजता सुटणार आहे. तर शेवटची बस रात्री १० वाजता सुटेल.

मेट्रो ७ साठी बस मार्ग -मेट्रो ७ वरील आरे मेट्रो स्थानक ते शिवशाही प्रकल्प दरम्यान नवीन वातानुकूलित बसमार्ग ए ६४७ सुरू करण्यात येणार आहे. या बसमार्गावरील बस आरे मेट्रो स्थानक, विरवानी, दिंडोशी आगार, गोकुळधाम, वाघेश्वरी मंदिर, सामना परिवार, नागरी निवारा परिषद अशी धावणार आहे. आरे मेट्रो स्थानकातून पहिली बस ६.२० वाजता सुटणार असून शेवटची बस रात्री १० वाजता सुटणार आहे. शिवशाही पार्क, मंत्री पार्क येथून पहिली बस सकाळी ६ वाजता सुटणार आहे. तर शेवटची बस रात्री ९. ४० वाजता सुटेल. तसेच या मेट्रो स्थानकावरील बेस्ट बस थांब्यावरून नियमित बस मार्ग सुरू राहणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा-Sanjay Raut's warning to BJP : राजकीय गुन्हेगारांच्या कॉलरला कायदेशीर मार्गाने हात घालणार - राऊत

हेही वाचा-Home Minister On Raut : संजय राऊत यांची भावना योग्यच गृहमंत्री वळसे- पाटील यांच्याकडून दुजोरा

हेही वाचा- Anil Deshmukh Money Laundering Case : अनिल देशमुखांच्या पीएसह आणि सचिन वाझेंची सीबीआय करणार चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.