ETV Bharat / city

प्रवाशांच्या मागणीनंतर 1 सप्टेंबरपासून मुंबईच्या गल्लोगल्ली धावणार 'बेस्ट'

आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असताना प्रवाशांच्या मागणीनुसार, उद्यापासून बेस्ट बसेस मुंबईच्या गल्लोगल्ली धावणार आहेत.

author img

By

Published : Aug 31, 2021, 5:15 PM IST

मुंबई - गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूमुळे बेस्ट उपक्रमातील बसेस अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर धावत होत्या. त्यामुळे नियमित मार्गवारील अनेक बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या होत्या. आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असताना प्रवाशांच्या मागणीनुसार, उद्यापासून बेस्ट बसेस मुंबईच्या गल्लोगल्ली धावणार आहेत. तसेच बसेसची संख्यासुद्धा वाढणार आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बसमार्गात बदल

बेस्ट उपक्रमाच्या सर्व बसमार्गाचा नियमितपणे आढावा घेण्यात येतो आणि बस प्रवर्तनातील अडचणी, प्रवाशांच्या सूचना इत्यादी बाबी विचारात घेऊन आवश्यकता वाटल्यास उपक्रमाच्या बससेवेत बदल करण्यात येतात. जेणेकरून प्रवाशांना जास्तीत जास्त समाधानकारक बससेवा देणे शक्य होते. मात्र, मार्च २०२०पासून कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर उपक्रमाच्या बस प्रवर्तनात अनेक तत्कालिक, प्रासंगिक बदल करावे लागल्यामुळे नियमित बस प्रवर्तनाचा आढावा घेणे शक्य झाले नव्हते. मात्र, आता बदलत्या परिस्थितीचा विचार करून उपक्रमाच्या बससेवेचा आढावा घेण्यात आलेला आहे. बसप्रवर्तनाचा आढावा घेऊन आवश्यक असलेल्या प्रवर्तनात्मक बदलांची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यावरून काही नवीन बसमार्ग सुरू करण्यात येत आहेत. तसेच अनेक विद्यमान बसमार्गाच्या प्रवर्तनात बदल करण्यात येत आहेत.

  • उद्यापासून 'येथे' धावणार बसेस -

    * बस क्रमांक सी -६ मंत्रालय ते डॉ. आंबेडकर उद्यानपर्यंत
    * बस क्रमांक एसी - ८ मंत्रालय ते शिवाजीपर्यंत
    * बस क्रमांक बीकेसी -१० बीकेसी टेलिफोन एक्स्चेंज ते बोरिवली स्थानक पश्चिमपर्यंत
    * बस क्रमांक बीकेसी - १२ वांद्रे रेल्वे टर्मिनस ते जलवायू विहारपर्यंत
    * बस क्रमांक बीकेसी -१३ वांद्रे रेल्वे टर्मिनस ते महाराणा प्रताप चौक-मुलुंडपर्यंत
    * बस क्रमांक बीकेसी - १६ बीकेसी टेलिफोन एक्स्चेंज ते सिपझ गावपर्यंत
    * बस क्रमांक - म. - १६ वडाळा आगार ते वाशीनाका-एमएमआरडीएपर्यंत
    * बस क्रमांक- ३० म. - मुंबई सेंट्रल आगार ते विक्रोळी आगारपर्यंत
    * बस क्रमांक - सी. ५० - जागतिक व्यापार केंद्र ते वाशी बस स्थानकपर्यंत
    * बस क्रमांक - ६२ - वीर हुतात्म्या भाई कोतवाल उद्यान ते विद्याविहारपर्यंत
    * बस क्रमांक - ७६ - मंत्रालय ते प्रतीक्षानगरपर्यंत
    * बस क्रमांक- १७३ - राणी लक्ष्मीबाई चौक-शिव ते ९० फूट मार्गपर्यंत
    * बस क्रमांक- २२९ - सांताक्रूझ आगार ते शांती आश्रमपर्यंत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.