ETV Bharat / city

BEST Mumbai : मुंबईकरांची लाईफलाईन बेस्ट आर्थिक संकटात; ४ हजार कोटीहून अधिकचे कर्ज, कर्ज फेडीसाठी बेस्टचा मोठा निर्णय

मुंबईकरांची लाईफलाईन असलेली बेस्ट आर्थिक संकटात ( BEST in financial crisis ) आहे. बेस्टवर ४ हजार कोटीहून अधिकचे कर्ज आहे. या कर्जातून मुक्तता करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

BEST Mumbai
बेस्ट आर्थिक संकटात
author img

By

Published : May 18, 2022, 7:57 PM IST

मुंबई - मुंबईकरांची लाईफलाईन असलेली बेस्ट आर्थिक संकटात ( BEST in financial crisis ) आहे. बेस्टवर ४ हजार कोटीहून अधिकचे कर्ज आहे. बेस्टची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून कुलाबा ते मुलुंड - दहिसर दरम्यानच्या जागा व्यावसायिक वापरासाठी दिल्या जाणार आहेत. तसा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला असून यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

जागा कमर्शिअल व्यवसायासाठी - सुरक्षित व गारेगार प्रवासाची सुविधा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाची गेल्या काही वर्षांत आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे महसूल वाढवण्यावर बेस्टने भर दिला आहे. यासाठी बेस्ट उपक्रमाने नवनवीन योजना अंमलात आणल्या आहेत. बेस्ट उपक्रमाच्या शहर व उपनगरात मिळून २७ बस आगार आहेत. तर वसाहती, कार्यालये आहेत. मात्र या जागांचा हवा तसा वापर होत नसल्याने कमर्शिअल म्हणजेच व्यवसाय करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. कुलाबा ते मुलुंड - दहिसर दरम्यान बेस्ट उपक्रमाने २० ठिकाणच्या जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. यासाठी मासिक मोबदल्यावर या जागा कमर्शिअल व्यवसायासाठी दिल्या जाणार आहेत.

या जागांसाठी निविदा - एकूण २० ठिकाणी कमर्शिअल वापरासाठी जागा भाड्यावर देण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. यात कांदिवली पश्चिम येथील कर्मचारी वसाहतीतील इमारत क्रमांक अ - मधील तळमजला, भोईवाडा येथील कर्मचारी वसाहतीतील इमारत क्रमांक बी - मधील तळमजला, ताडदेव येथील अरुण कमर्शिअल प्रिमायसेस इमारतीतील ५ व्या मजल्यावर, परळ येथील कर्मचारी वसाहतीतील इमारत क्रमांक ए - मधील तळमजल्यावर, मुलुंड पश्चिम येथील कर्मचारी वसाहत परिसरात असलेल्या वेगळ्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर, मागाठाणे येथील वाहतूक कार्यालय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर अशा एकूण २० ठिकाणच्या जागा भाड्याने दिल्या जाणार आहेत.

हेही वाचा - Indrani Mukherjee : कोण आहेत इंद्राणी मुखर्जी? ज्यांच्यावर शीना बोराच्या हत्येचा आहे आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.