मुंबई - मुंबई उच्च न्यायालय 1 ऑक्टोबरपासून सर्व खंडपीठांवर प्रत्यक्ष सुनावणी सुरू करणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 ते व दुपारी ३ ते सांयकाळी 5 या वेळेत सुनावणी सुरू असेल. मुंबई हायकोर्ट तसेच गोवा खंडपीठासह सर्व खंडपीठांमधील प्रत्यक्ष सुनावणी 1 ऑक्टोबरपासून फक्त ११ ते दुपारी २ व दुपारी ३ ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू होईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने अधिसूचित केले आहे. 29 सप्टेंबर रोजी दिलेल्या नोटीसनुसार पुढील 1 ते 30 ऑक्टोबर दरम्यान मुख्य न्यायाधीशांकडे प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहेत.
न्यायाधीश पी.बी. वरले आणि न्यायमूर्ती व्ही.जी. बिष्ट यांचे खंडपीठ तसेच न्यायाधीश एस.एस. जाधव आणि एन.जे. जामदार यांचे खंडपीठ एकाच दिवशी सुनावणीसाठी बसतील. न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्यायमूर्ती पी.डी. नाईक यांचे खंडपीठ सुनावणीसाठी प्रकरणे घेईल. कोरोनाच्या प्रभावामुळे प्रत्यक्ष कोर्टाची सुनावणी बंद होती. परंतु आता काही प्रमाणात प्रत्यक्ष सुनावणीसाठी उच्च न्यायालय परत सुरू होत आहे.
उद्यापासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी 'बिगीन अगेन'.. - मुंबई उच्च न्यायालय सुनावणी
मुंबई उच्च न्यायालय 1 ऑक्टोबरपासून सर्व खंडपीठांवर प्रत्यक्ष सुनावणी सुरू करणार आहे. 29 सप्टेंबर रोजी दिलेल्या नोटीसनुसार पुढील 1 ते 30 ऑक्टोबर दरम्यान मुख्य न्यायाधीशांकडे प्रत्यक्ष उपस्थित राहून सुनावणी घेणार आहेत. कोरोनामुळे मागील जवळपास सहा महिन्यांपासून न्यायालयातील प्रत्यक्ष सुनावणी बंद होती व न्यायालयाचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने चालत असे. मुंबई, औरंगाबाद, नागपूर अन् गोवा खंडपीठाचे कामकाज उद्यापासून प्रत्यक्ष सुरू होत आहे.
मुंबई - मुंबई उच्च न्यायालय 1 ऑक्टोबरपासून सर्व खंडपीठांवर प्रत्यक्ष सुनावणी सुरू करणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 ते व दुपारी ३ ते सांयकाळी 5 या वेळेत सुनावणी सुरू असेल. मुंबई हायकोर्ट तसेच गोवा खंडपीठासह सर्व खंडपीठांमधील प्रत्यक्ष सुनावणी 1 ऑक्टोबरपासून फक्त ११ ते दुपारी २ व दुपारी ३ ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू होईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने अधिसूचित केले आहे. 29 सप्टेंबर रोजी दिलेल्या नोटीसनुसार पुढील 1 ते 30 ऑक्टोबर दरम्यान मुख्य न्यायाधीशांकडे प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहेत.
न्यायाधीश पी.बी. वरले आणि न्यायमूर्ती व्ही.जी. बिष्ट यांचे खंडपीठ तसेच न्यायाधीश एस.एस. जाधव आणि एन.जे. जामदार यांचे खंडपीठ एकाच दिवशी सुनावणीसाठी बसतील. न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्यायमूर्ती पी.डी. नाईक यांचे खंडपीठ सुनावणीसाठी प्रकरणे घेईल. कोरोनाच्या प्रभावामुळे प्रत्यक्ष कोर्टाची सुनावणी बंद होती. परंतु आता काही प्रमाणात प्रत्यक्ष सुनावणीसाठी उच्च न्यायालय परत सुरू होत आहे.
TAGGED:
मुंबई उच्च न्यायालय सुनावणी