ETV Bharat / city

मुंबईकरांनो घाबरू नका.. कोविड रुग्णालयातील बेड रिक्त, ३६ हजार बेड वाढवणार - पालिका आयुक्त

रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णालयांमध्ये रुग्णशय्या रिक्त असल्याने मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे. मुंबईत जंबो कोविड सेंटरमध्ये ९ हजार, लहान व मोठे खासगी रुग्‍णालये मिळून ७ हजार तर इतर रुग्णालयांमध्ये २० हजार अशा एकूण ३६ हजार रुग्णशय्या वाढवल्या जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Municipal Commissioner Iqbal Singh Chahal

author img

By

Published : Mar 30, 2021, 8:36 PM IST

मुंबई - मुंबईत गेल्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरु झाला. जानेवारी फेब्रुवारीत काही प्रमाणात कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णालयांमध्ये रुग्णशय्या रिक्त असल्याने मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे. मुंबईत जंबो कोविड सेंटरमध्ये ९ हजार, लहान व मोठे खासगी रुग्‍णालये मिळून ७ हजार तर इतर रुग्णालयांमध्ये २० हजार अशा एकूण ३६ हजार रुग्णशय्या वाढवल्या जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

आवश्‍यकतेनुसार बेड -

पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आज बीकेसी कोविड सेंटर येथे जाऊन कोरोना विषाणूवरील लस घेतली. यानंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना सद्यस्थितीत मुंबईत कोविड रुग्‍णांसाठी राखीव असलेल्‍या रुग्‍णशय्यांपैकी सुमारे ३ हजार रुग्‍णशय्या रिक्‍त आहेत. यात खासगी रुग्‍णालयातील ४५० बेडचाही समावेश आहे. मुंबईत रुग्‍णशय्यांची कोणतीही कमतरता नाही. यापुढेही कमतरता भासणार नाही, याची दक्षता महानगरपालिका प्रशासन घेत असून नागरिकांनी घाबरुन जावू नये. रुग्‍णांनी व त्‍यांच्‍या नातेवाईकांनी आपापल्‍या विभागातील वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधला की त्‍यांना आवश्‍यकतेनुसार बेड पुरवला जाईल असे चहल यांनी सांगितले.

रुग्णांनी घाबरून जाऊ नये -

महानगरपालिकेच्‍या जम्‍बो कोविड सेंटर्स तसेच खासगी रुग्‍णालयात ८० टक्‍के रुग्‍णशय्या पुन्‍हा कोविड रुग्‍णांसाठी सक्रिय केल्‍या जात आहेत. १० फेब्रुवारी २०२१ रोजी ३ हजार ५०० इतकी रुग्‍णशय्यावर रुग्ण होते. आता ९ हजार ९०० रुग्‍णशय्यांवर रुग्‍ण आहेत. त्यापैकी ८ हजार ४०० मुंबईतील तर १ हजार ५०० मुंबई महानगर प्रदेशातील आहेत. मागील ४८ दिवसांत एकूण बाधितांच्‍या संख्‍येच्‍या तुलनेत फक्‍त ५ हजार बेड रुग्‍णांसाठी आवश्‍यक भासले. म्‍हणून रुग्‍णांनी व नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन आयुक्‍तांनी केले.

२० हजारापेक्षा जास्त रुग्णशय्या -

रुग्‍णशय्या वाढीबाबत चहल म्‍हणाले की, सध्‍याची रुग्‍णशय्यांची क्षमता वाढवून ती एकूण २० हजारापेक्षा जास्त इतकी करण्‍यात येत आहे. दर आठवड्याला टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने याप्रमाणे ही संख्‍या वाढवण्‍यात येत आहे. जून ते नोव्‍हेंबर २०२० या कालावधीत महानगरपालिकेकडे ताब्‍यात असलेली खासगी लहान रुग्‍णालयांची सुमारे २ हजार २६९ रुग्‍णशय्या क्षमता महानगरपालिकेने आता पुन्‍हा ताब्‍यात घेतली आहे. ‍यामध्‍ये ३६० अतिदक्षता उपचारांसाठी आहेत. सर्व सरकारी व खासगी रुग्‍णालये इत्‍यादी मिळून सुमारे २० हजारापेक्षा जास्त रुग्‍णशय्या मुंबईमध्‍ये उपलब्‍ध राहणार असून हे सर्व बेड तयार आहेत. ते फक्‍त टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने व मागणीनुसार कार्यान्‍व‍ित करायचे आहेत, असे चहल यांनी नमूद केले.

रुग्णालयांमध्ये ७ हजार रुग्णशय्या -

मुंबईतील ३५ मोठ्या रुग्‍णालयांमध्‍ये मिळून ४ हजार ८०० बेड कोविड रुग्‍णांच्‍या उपचारांसाठी उपलब्‍ध होते. कोविड संसर्ग मध्‍यंतरी नियंत्रणात आल्‍यानंतर सर्व मिळून २ हजार ३५० रुग्‍णशय्या इतर आजारांवरील उपचारांसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले होते. संसर्ग वाढत असल्‍याने आता पुन्‍हा ४ हजार ८०० कोविड रुग्‍णशय्या क्षमता गाठण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. लहान व मोठे खासगी रुग्‍णालये मिळून ७ हजार रुग्‍णशय्या कोविड रुग्‍णांसाठी उपलब्‍ध होतील, असे आयुक्‍तांनी स्‍पष्‍ट केले.

जंबो सेंटरमध्ये ९ हजार रुग्णशय्या -

महानगरपालिकेच्‍या जंबो सेंटर्सविषयी माहिती देताना आयुक्‍तांनी स्‍पष्‍ट केले की, बीकेसी कोविड सेंटर टप्‍पा २ मध्‍ये सुमारे ७५० तर गोरेगांव येथील नेस्‍को कोविड सेंटरमध्‍ये १ हजार याप्रमाणे रुग्‍णशय्या उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहेत. नेस्‍कोची क्षमता ३ हजार रुग्‍णशय्यांची असून सध्‍या १ हजार बेड उपलब्‍ध आहेत. बीकेसीमध्‍ये २,१०० बेड क्षमता असून सध्‍या १ हजार बेड उपलब्‍ध आहेत. रिचर्डसन क्रूडास कोविड सेंटरमध्‍ये ७०० बेड उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत. फक्‍त जंबो सेंटर्सचा विचार करता एकूण ९ हजार रुग्‍णशय्या उपलब्‍ध असतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.