मुंबई : टीआरपी घोटाळ्याबाबत मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. आज मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसार माध्यमांना माहिती दिली, पोलिस तपासानुसार टीआरपीमधील फसवणूकीचा खेळ हा चक्क 2016 साला पासून सुरू होता. 2016 ते 2019 या काळात घरांमधून येणाऱ्या डेटाची सर्वाधिक छेडछाड केली गेली. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
प्राथमिक पुराव्यांनुसार आरोपपत्र दाखल..
मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या म्माहितीनुसार प्राथमिक पुराव्यांच्या आधारे आरोपपत्र दाखल केले आहे. 2016 ते 2019 च्या दरम्यान टीआरपी डेटामध्ये सर्वाधिक बदल तेलगू आणि इंग्रजी भाषेच्या वाहिन्यांच्या प्रवेशासंदर्भात करण्यात आले.
ठोस पुराव्यांनंतर आरोपींना अटक..
ठोस पुरावे मिळाल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. कारण एखाद्या विशिष्ट वाहिनीची अधिक टीआरपी दर्शविण्यासाठी डेटामध्ये सतत छेडछाड केली जात असल्याचे समोर आले आहे. यावर्षी 6 ऑक्टोबर रोजी टीआरपीमध्ये घोटाळ्याचा गुन्हा दाखल केल्याची माहितीही पोलिसांनी दिली. रिपब्लिक टीव्ही टीआरपीमध्ये अव्वल क्रमांकाचा बनला होता, हे तपासणी दरम्यान त्यांना समजले.
हेही वाचा : 'कोरोना-२'च्या पार्श्वभूमीवर मुंबईत शोधाशोध सुरू; महिनाभरात परदेशातून आले ४,०९३ प्रवासी