मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहेत. या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव येत आहे. या संदर्भातएक कथित ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी २२ वर्षीय पुजा चव्हाणने पुणे शहरातील वानवडी परिसरात आत्महत्या केली होती. पूजाची सोशल मीडियावर टिक-टॉक स्टार, अशी ओळख होती.
महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड-
दरम्यान, या आत्महत्या प्रकरणासंदर्भात नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणाशी संजय राठोड थेट संबंध असल्याचा उल्लेख भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे प्रकरणानंतर संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे.
बंजारा समाजाचे नेते आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड म्हणाले, याबाबत काय बोलायचं आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत. या सगळ्या प्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू आहे आणि या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केल आहे. त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करणार नाही. माझा संजय राठोड यांच्याशी संपर्क झालेला नाही. जर माझा संपर्क झाला तर मी त्यांना या प्रकरणासंदर्भात विचारणा करेले, अशी माहिती त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितले.
बंजारा समाज आवाज उठवणार-
पुणे पोलिसांनी अरूण राठोड आणि विलास चव्हाण यांचेही जबाब नोंदवले आहेत. तसंच मुलीच्या आई वडिलांचेही जबाब नोंदवले. यामधून पोलिसांच्या हाती नवनवी माहिती येत आहे. या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत पुणे पोलीस तपास करणार करणार आहेत. पूजा चव्हाण ही बंजारा समाजातील तरुणी होती त्यामुळे बंजारा समाजाकडून या मुलीला न्याय मिळावा यासाठी आवाज उठत आहे.
हेही वाचा- पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर आजपासून फास्टटॅग बंधनकारक