मुंबई - उपनगरीय लोकल बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा फोन (bomb attack threat) वांद्रे रेल्वे स्थानकाच्या आरपीएफ पोलिसांना आला आहे. त्यानंतर रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस, आरपीएफ, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक, श्वान पथकाद्वारे तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. यांची माहिती सर्व यंत्रणांना देण्यात आली आहे. सध्या लोहमार्ग पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली.
लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू
उपनगरीय लोकल सेवा बॉम्बने उडवून देण्याची धमकी आज वांद्रे आरपीएफला दूरध्वनीवरून प्राप्त झाली आहे. कॉलरशी संपर्क साधण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या फोनची माहिती सर्व यंत्रणांना देण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही, अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली.
धमकीच्या कॉलनंतर तत्काळ रेल्वे पोलीस, आरपीएफ यांच्याद्वारे उपनगरीय लोकलच्या सर्व रेल्वेस्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. तसेच, संवेदनशील स्थानकात बॉम्ब शोधक आणि निकामी पथक, श्वान पथकाद्वारे तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - Fadnavis on Tripura Violence : त्रिपुरात असे काही घडलेच नाही, हे एक सुनियोजित षडयंत्र; फडणवीसांचा दावा