मुंबई : दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे गट व शिंदे गट यांच्यामध्ये चालू असलेली रस्सीखेच आता संपुष्टात आली ( Uddhav Thackeray Group Vs Shinde Group ) आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी केलेला अर्ज ( Bandra Kurla Complex Give Shinde Group ) एमएमआरडीएने स्वीकारला ( MMRDA has Accepted Application of Shinde Group ) असून, त्यांना वांद्रे-कुर्ला संकुलात परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता, ते मैदान आरक्षित असल्याने तो अर्ज फेटाळण्यात आला ( Uddhav Thackerays Shiv Sena Application Rejected ) आहे.
शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा? : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात रणकंदन माजले आहे. शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्कवरच होणार, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यासाठी शिंदे गटाचे शिवाजी पार्कचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेत अर्ज केला आहे. परंतु शिंदे गटाने अर्ज करण्याअगोदर उद्धव ठाकरे गटाने महापालिकेकडे अर्ज केला असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार ते मैदान ठाकरे गटालाच भेटणार का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणाचा मेळावा मोठा, ठाकरे गट की शिंदे गट? : एमएमआरडीएतील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाने ज्या मैदानासाठी त्यांच्याकडे अर्ज केला होता, ते मैदान आरक्षित नसल्याने त्यांना ते देण्यात आले आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या गटाने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता, ते मैदान आरक्षित असल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजीपार्कवरच होणार असल्याचे जवळपास आता निश्चित झाले आहे.
दसरा मेळाव्यात कोण खेचणार गर्दी : मागील काही दिवसांपासून दसरा मेळावा मैदानावरून उद्धव ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात सुरू असलेली रस्सीखेच आता जवळपास संपुष्टात जरी आली असली तरी कुणाचा मेळावा मोठा होणार, कोण किती गर्दी खेचण्यात यशस्वी होणार यावरून आता उद्धव ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही गटात चढाओढ सुरू झाली असून, कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्व जोमाने कामाला लागले आहेत.