ETV Bharat / city

प्रसिद्ध मूर्तिकार बांदेकर यांचा वारसा कायम; घर सांभाळून पाचही मुली घडवतात सुबक मूर्ती - Bandekar sister idol business

प्रसिद्ध मूर्तिकार बाबी बांदेकर यांचे 2015 साली निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या 5 मुलींनी मूर्ती घडवण्याचा त्यांच्या वारसा पुढे सुरू ठेवला आहे. त्यांनी चेंबूर अमरमहाल येथील गणेश चित्र मंदिर मूर्तिशाळेचे सूत्र हातात घेत अविरतपणे काम सुरू ठेवले आहे.

ganesh chitra mandir school Mumbai
गणेश चित्र मंदिर मूर्तिशाळा मुंबई
author img

By

Published : Sep 7, 2021, 9:22 PM IST

मुंबई - प्रसिद्ध मूर्तिकार बाबी बांदेकर यांचे 2015 साली निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या 5 मुलींनी मूर्ती घडवण्याचा त्यांच्या वारसा पुढे सुरू ठेवला आहे. त्यांनी चेंबूर अमरमहाल येथील गणेश चित्र मंदिर मूर्तिशाळेचे सूत्र हातात घेत अविरतपणे काम सुरू ठेवले आहे. गेल्यावर्षीपासून कोरोना माहामारीमुळे व्यवसाय संकटात आहे, पण यावर्षी बऱ्यापैकी गणेश मूर्तींची मागणी आहे. या मूर्ती मुंबई, महाराष्ट्रासह विदेशातही जात असतात. घर संसार सांभाळून बांदेकर भगिनी हा व्यवसाय सांभाळत आहेत.

माहिती देताना बांदेकर बहिणी आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - राज्यातील मंदिरे बंद; मात्र आरोग्य मंदिरे सुरू.. जनता आशीर्वाद देईल, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

गणेश कला मंदिर ही मुंबईतील जुनी मूर्तिशाळा आहे. गेल्या तेरा वर्षांपासून मूर्ती तयार करण्याचे काम या मूर्ती शाळेत सुरू आहे. 53 वर्ष या मूर्तिशाळेला झालेली आहेत. बाबी बांदेकर यांनी मूर्तिकलेने मुंबईकरांना मोहून टाकले होते. त्यांचा समृद्ध वारसा तितक्याच समर्थपणे त्यांच्या पाच मुली चालवत आहेत. त्यांच्याकडून फायबर, प्लास्टर ते निसर्गपूरक कागदी लगदा, शाडूची माती अशा माध्यमातून श्री गणेश आणि देवी मातेच्या मूर्ती घडविल्या जातात. त्याचबरोबर, विविध प्रकारचे डेकोरेटिव्ह मटेरीयल घडवणे वर्षभर अविरत चालू असते. प्रतिभा, विमल, मनीषा, हेमा, तृप्ती अशी या पाच बहिणींची नावे आहेत.

53 वर्ष जुणा इतिहास असणारी आमची मूर्तिशाळा आहे. लहाणपणापासूनच आम्ही मूर्ती तयार करण्याचे धडे बाबांकडून घेतले. बाबा गेल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून आम्ही पाच बहिणींनी एकत्र येत हा व्यवसाय सुरू ठेवला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी आम्ही पाचशे ते साडेपाचशे मूर्ती तयार करत होतो, मात्र गेल्या दोन वर्षांपासून ही संख्या अर्धी झाली आहे. या वर्षी आम्ही फक्त दोनशे मूर्ती तयार केल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मागणी चांगली आहे, असे प्रतिभा बांदेकर यांनी सांगितले.

मूर्ती तयार करणे आम्ही लहानपणापासून शिकलो. बाबा गेल्यानंतर आम्ही ही जबाबदारी पेलत आहोत. घरातील काम करून आम्ही यासाठी वेळ काढतो. रात्रीच सगळी तयारी करून ठेवतो व सकाळी पूर्ण दिवस मूर्तिशाळेला देतो. यावेळी मागील वर्षीपेक्षा चांगली मागणी आहे, असे हेमा बांदेकर यांनी सांगितले.

हेही वाचा - Urban Naxalism Case : रोना विल्सन यांना वडिलांच्या अंत्यविधीसाठी तात्पुरता जामीन मंजूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.