मुंबई - काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांद्रा येथे स्थित कराची बेकरीच्या नावावरून मोठा वादंग उभा केला होता. या विरोधानंतर कराची बेकरीची बांद्रा येथील शाखा बंद करण्यात आलेली आहे. मनसे नेते हाजी अराफत शेख यांनी ट्विट करून याबाबातची माहिती दिली आहे. मात्र कराची बेकरी ही मनसेच्या विरोधाने नाहीतर आर्थिक अडचणीमुळे बंद करण्यात आली असल्याची माहिती कराची बेकरी व्यवस्थापनाने दिली आहे.
मनसेने परवलेली ही माहिती चुकीची आहे. बेकरी बंद करण्याचा निर्णय हा बेकरीच्या नावातील बदलाच्या निर्देशनामुळे घेतलेला नाही, तर बेकरी सध्या स्थित असलेल्या जागेचा
भाडेकरार संपला असून जागेच्या मालकाने अधिक भाडेवाढ केली आहे. त्यामुळे आम्ही बेकरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे धंद्यावर मोठा परिणाम झाला होता. ग्राहक संख्यादेखील मोठी घट झाली होती. यामुळे बेकरी बंद करण्याचा निर्णय घेतले असल्याचे बेकरीचे मॅनेजर रामेश्वर वाघमारे यांनी म्हटले आहे.