मुंबई - राज्यात कोरोना तसेच ओमायक्रॉन ( Omicron Variant ) विषाणूचा प्रसार वाढला आहे. यामुळे राज्य सरकारने राज्यात रात्री जमावबंदी ( Night Curfew in Maharashtra ) लागू केली आहे. मुंबईत नाताळ आणि 31 डिसेंबरला नव वर्षाचे स्वागत ( New Year Celebration ) मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यासाठी पार्ट्यांचे आयोजन केले (New Year Parties and Events ) जाते. कोरोना तसेच ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पार्ट्या, कार्यक्रमावर तसेच कार्यक्रमासाठी एकत्र बंदी घालण्यात आली आहे. तसे परिपत्रक पालिका आयुक्तांनी काढले आहे.
![Mumbai Municipal Corporation Circular](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-new-guidelines-7205149_25122021111907_2512f_1640411347_497.jpg)
राज्यात रात्रीची जमावबंदी -
राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कालच राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी असेल. सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ते निर्बंध काल मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray Appeal ) यांनी केले आहे. स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुसार निर्बंध आणखी कडक करण्याचे अधिकार दिले आहेत.
पार्ट्यांवर बंदी -
मुंबईत डिसेंबरच्या सुरुवातीला कोरोनाचे 100 ते 200 रुग्ण आढळून येत होते. त्यात वाढ होऊन गेल्या दोन दिवसात कोरोनाचे 600 हुन अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच काल ओमायक्रॉनचे 11 रुग्ण आढळून आल्याने रुग्णांचा आकडा 47 वर गेला आहे. अशा परिस्थितीत नागरिक एकत्र आल्यास कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. हा प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी नाताळ आणि 31 डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम, पार्ट्या तसेच एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे.