ETV Bharat / city

Ban Construction Work : मुंबईत रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत बांधकामावर बंदी - आयुक्त संजय पांडे - mumbai police commissioner sanjay pandey

मुंबईतील रात्री होणाऱ्या बांधकामामुळे प्रदूषण वाढत आहे. त्याची तक्रार नागरिकांना पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे ( Mumbai Police commissioner Sanjay Pandey ) केली होती. त्यानंतर पांडे यांनी रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत बांधकामावर बंदी घातली ( Ban Construction Work ) आहे.

sanjay pandey
sanjay pandey
author img

By

Published : Mar 11, 2022, 8:04 PM IST

मुंबई - पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police commissioner Sanjay Pandey ) यांनी पदभार घेतल्यानंतर मुंबईकरांसोबत संवाद साधला होता. या संवादात त्यांनी मुंबईकरांना काही समस्या असल्यास मोबाईक क्रमांक सार्वजनिक केला होता. त्यानंतर त्यांना आलेल्या तक्रारीची दखल घेत आयुक्त पांडे यांनी तत्काळ एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे मुंबई शहरात रात्री दहा ते सकाळी सहा वाजेर्यंत बांधकामासंबंधीत कामे करण्यास बंदी घातली ( Ban Construction Work ) आहे.

संजय पांडे नागरिकांशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजमाध्यमावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तक्रार आणि समस्येकडे ते लक्ष वेधत आहेत. बांधकामाच्या वेळी मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, अशी व्यथा फेसबुक लाईव्हमध्ये काही नागरिकांनी मांडली होती. त्यावर संजय पांडे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

  • To keep #noiseundercontrol In Mumbai met developers in city. Agreed to have construction only between 6 am to 10pm. Noise levels only under 65 decibels. Display boards indicating timings and decibel levels at all sites. We will check noncompliance. @MumbaiPolice

    — Sanjay Pandey (@sanjayp_1) March 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संजय पांडे म्हणाले की, नामांकित बांधकाम व्यावसायिकांची भेट घेतली. मुंबईतील ध्वनिप्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी शहरातील विकासकांची भेट घेतली. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच बांधकाम करण्याचे त्यांनी मान्य केले, अशी माहिती पांडे यांनी दिली आहे.

आयुक्तांनी विकासकांना केलेल्या सूचना

  • बांधकाम स्थळी आवाज रोखणारे अडथळे बसवा
  • आवाजाची पातळी डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त नकाे
  • रक्षक मुख्य रस्त्यांवरच न ठेवता केवळ बांधकामाच्या ठिकाणी तैनात करावा
  • आवाजाची पातळी फक्त ६५ डेसिबलच्या खाली असावी
  • बांधकामांच्या ठिकाणी कामाचे तास दाखवणारे फलक असावेत. सर्वच बांधकाम ठिकाणी वेळ आणि डेसिबल पातळी दर्शविणारे फलकही असतील याची विकासकांनी दक्षता घ्यावी

हेही वाचा - Devendra Fadnavis Criticize Mahavikas Aghadi : सरकारने अर्थसंकल्पात सर्व घटकांच्या तोंडाला पाने पुसली - फडणवीसांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.