शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती. हिंदुह्रदयसम्राट ही त्यांना जनसामान्यांनी दिलेली उपाधी. शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय झालेल्या बाळासाहेबांनी पक्षाची स्थापना मराठी माणसाच्या हक्कासाठी केली. मराठी माणसाच्या हक्काचा लढा ही शिवसेनेच्या स्थापनेमागील मूळ प्रेरणा होती.
- 1950 मधील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बाळासाहेब ठाकरेंचा सक्रीय सहभाग होता.
- मुंबईसह मराठी भाषिकांचे एक राज्य असावे ही या चळवळीमागील मुख्य भूमिका होती.
- महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबईत मराठी माणसाची पिछेहाट होत असल्याचे पाहून बाळासाहेब व्यथित झाले.
- यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत मराठई माणसाच्या हक्कासाठी मोठा लढा उभारला.
- मुंबईत परप्रांतीयांच्या वाढत्या वर्चस्वात मराठी माणसाची पिछेहाट होत असल्याचे पाहून व्यथित झालेल्या बाळासाहेबांनी मार्मिक या साप्ताहिकात आपल्या कुंचल्यातून यावर परखड ताशेरे ओढले.
- मराठी माणसाच्या मुद्द्यावरच बाळासाहेबांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली.
- माराठी माणसाच्या हक्काचा लढा मजबूत करताना शिवसेनेने 'बजाओ पुंगी, हटाओ लुंगी' ही घोषणा सर्वप्रथम दिली.
- मराठी माणसांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची मागणीही बाळासाहेबांनी जोरकसपणे लावून धरली.
- कर्नाटकातील कारवार, बेळगाव, निपाणीचा महाराष्ट्रात समावेश करण्याची मागणीही शिवसेनेने बाळासाहेबांच्याच नेतृत्वात लावून धरली.
हेही वाचा - फडणवीसांचे एकीकडे बाळासाहेबांना अभिवादन; तर दुसरीकडे शिवसेनेला फटकारे