मुंबई : तिथीनुसार येणारी शिवजयंती, गुढीपाडवा व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी शिवजयंती व पाडवा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावर चर्चा झाली.
'सोबत आले तर सोबत नाहीतर त्यांना सोडून'
या बैठकीत भाजप सोबत युती बाबत कोणती चर्चा झाली का असा प्रश्न पत्रकारांनी बाळा नांदगावकर यांना विचारला असता नांदगावकर म्हणाले की, "आत्तापर्यंत आम्ही एकटेच लढलो. ते आले तर त्यांच्यासोबत नाही तर त्यांच्या विना आम्ही ही निवडणूक लढवू."
शिवजयंती मोठ्या थाटात
"साहेबांनी तिथीनुसार होणारी शिवजयंती मोठ्या थाटात करणे चे वयात महिलांनी देखील मोठ्या उत्साहात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. यात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे कारण हा आपला सण आहे." असे देखील बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
पाडवा मेळावा शिवाजी पार्कवर
"मागची दोन ते तीन वर्ष कोरोनामुळे आमचा पाडवा मेळावा शिवाजी पार्कवर होऊ शकला नव्हता. मात्र, आता सध्या तसे फारसे निर्बंध नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या गर्दीत आणि मोठ्या उत्साहात यावर्षीचा पाडवा मेळावा घेण्याचा विचार आहे." असेही ते म्हणाले.
हेही वाचा - Chandrapur : चंद्रपूरच्या विद्युत केंद्रातील भरतीची विभागीय आयुक्त स्तरावरून चौकशी - प्राजक्त तनपुरे
MNS Meeting : 'सोबत आले तर सोबत नाहीतर त्यांना सोडून' भाजप मनसे युती वर मनसे नेत्यांचं सूचक वक्तव्य - बाळा नांदगावकर ऑन युती
शिवजयंती, गुढीपाडवा व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक ( MNS Meeting ) पार पडली. यात सोबत आले तर सोबत नाहीतर त्यांना सोडून लढू असे मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.