मुंबई - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांना मोठी भेट देणाऱ्या योजना जाहीर केल्या आहेत. महिलांच्या नावे घरे खरेदी केल्यास १ एप्रिलपसाून मुद्रांकावर सवलत मिळणार आहे.
राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. घरातील महिलेच्या नावावर घराची नोंदणी झाल्यास मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिली जाणार आहे.
हेही वाचा-बजरंग पुनिया ठरला जगातील अव्वल कुस्तीपटू
- ग्रामीण विद्यार्थिनींच्या मोफत बस प्रवासासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या नावाने योजना. १,५०० सीएनजी आणि हायब्रिड बस उपलब्ध करुन देण्यात येणार.
- शहरांमध्ये 'तेजस्विनी' योजनेंतर्गत बसस वाढवणार.
- राज्य राखीव पोलीस दलामध्ये स्वतंत्र महिला गट स्थापन होणार.
- महिला व बालविकास विभागासाठी ३,७६७ रुपयांची राज्य आणि केंद्राची एकत्रित तरतूद.
- सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेसाठी बीजभांडवल म्हणून २५० कोटी रुपयांची तरतूद. यामध्ये जमा होणाऱ्या रकमेतून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना राबविण्यात येणार आहे.
हेही वाचा-मराठा आरक्षणावर सुनावणी स्थगित; 15 मार्च रोजी होणार पुढील सुनावणी