मुंबई - भारतीय रेल्वेचा ( Central Railway ) मेल-एक्स्प्रेस गाड्या आणि लोकल ट्रेन धुण्यासाठी रेल्वेला बराच वेळ आणि हजारो कोटी रुपयांचा खर्च येतो. मात्र, आता रेल्वेचे डबे धुण्यासाठी मेक इन इंडियातंर्गत 'ऑटोमॅटिक बोगी वॉश प्लांट'मुळे वेळ आणि मनुष्यबळ दोन्हीची बचत होणार आहे. मध्य रेल्वेचा माटुंगा कारखान्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा देशातील पहिला ऑटोमॅटिक बोगी वॉश प्लांट" बसवण्यात आला आहे. अवघ्या ४५ मिनिटांत रेल्वेचा संपूर्ण डबा होणार चकाचक होईल.
ऑटोमॅटिक बोगी वॉशिंग प्लांट पाण्याची होणार बचत मध्य रेल्वेनें दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमॅटिक बोगी वॉश प्लांटमुळे सर्व प्रकारच्या एफ़आयएटी आणि आयसीएफ बोगी एका बंद चेंबरमध्ये दाबलेल्या अल्क प्रकारच्या द्रावणाने स्वच्छ केल्या जाऊ शकतात. वॉशिंग प्रक्रिया प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी हे प्लांट वेळ, पाणी आणि मनुष्यबळ कमी करण्यास मदत करते. ऑटोमेशन, प्लांटची कार्यक्षमता आणि पाण्याच्या पुनर्वापराच्या प्रक्रियेमुळे, हाताने धुण्याच्या तुलनेत गोड्या पाण्याचा वापर ६० टक्के पेक्षा कमी होईल अशी अपेक्षा आहे. ऑटोमॅटिक बोगी वॉश प्लांट कॅप्टिव्ह इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (ETP) ने सुसज्ज आहे. आणि ETP मधून अंतिम डिस्चार्ज पर्यावरणीय नियमांची पूर्तता करतो. युनिटमधून बोगीची हालचाल जाणवल्यावर प्लांट आपोआप चालतो आणि ४५ मिनिटांत बोगी धुतली जाते.देशातील पहिला प्लांटमध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, ऑटोमॅटिक बोगी वॉश प्लांट हा पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय आहे आणि ट्रेनच्या देखभाल आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ऑटोमेशनच्या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल आहे. “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत नुकताच स्थापित केलेला “स्वयंचलित बोगी वॉश प्लांट” हा भारतीय रेल्वेवरील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे.हेही वाचा - विद्यार्थिनींनी 65 किमी पायी प्रवास करून गाठले प्रकल्प कार्यालय; डीबीटीसह इतर समस्यांचा वाचला पाढा