ETV Bharat / city

Sanjay Raut On Bjp : संजय राऊतांचा भाजपाला टोला; म्हणाले, "ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून..." - Sanjay Raut On Bjp

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भाजपाकडून सतत भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात येत आहे. त्यावर भाजपाला उत्तर देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद घेत उत्तर देण्यात येणार असल्याचे संजय राऊत यांनी ( Sanjay Raut Press Conference Shivsena Bhavan ) सांगितले.

Sanjay Raut
Sanjay Raut
author img

By

Published : Feb 13, 2022, 12:39 PM IST

मुंबई - भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्यावर भाजपाकडून येणाऱ्या आरोपांना आपण मंगळवारी ( 15 फेब्रुवारी ) दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत कागदपत्राच्या पुराव्या सहीत उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ( Sanjay Raut Press Conference Shivsena Bhavan ) दिला. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवावे, असा टोलाही राऊत यांनी भाजपाला ( Sanjay Raut On Ed Cbi ) लगावला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांना बोलत होते.

10 मार्चला महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, हे सरकार स्थापन झाल्यापासूनच ते कोणत्या ना कोणत्या मार्गे कोसळावे यासाठी भाजपा नेते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या मागे लावण्यात आल्या. आता ही भाजपाकडून तसा प्रयत्न केला जातोय. त्यातच पाच राज्याच्या निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. याआधी ही पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातले सरकार कोसळेल, असे म्हणण्यात येत होते. त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून भाजपाने आपले प्रयत्न सुरू ठेवावेत, असा टोलाही संजय राऊत यांनी या वेळी लगावला.

आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशला जाणार

नुकतेच आदित्य ठाकरे गोव्याहुन परतले आहेत. लवकरच ते उत्तर प्रदेशलाही जातील. त्यावेळी आदित्य ठाकरे हे अखिलेश यादव यांची भेट घेणार आहे. तसेच, उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव सरकार बनणार आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुका शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा - Ahmednagar Car Accident : भीषण कार अपघातात तीन मित्रांवर काळाचा घाला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.