ETV Bharat / city

Nawab Malik : 'सुनियोजित पद्धतीने गांधीजींचे चारित्रहनन करण्याचा प्रयत्न सुरू' - बापूंचे विचार

नियोजन पध्दतीने महात्मा गांधी (Mahatma Gandhi), पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) व अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम आधीपासूनच सुरू आहे. खोटा इतिहास सांगणे, खोटी माहिती उपलब्ध करून देणे अशा पध्दतीने वारंवार असे लोक बोलत आहेत असेही नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले.

Nawab Malik on Kangana Ranaut Statement in mumbai
Nawab Malik : 'सुनियोजित पद्धतीने गांधीजींचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न सुरु'
author img

By

Published : Nov 17, 2021, 1:13 PM IST

Updated : Nov 17, 2021, 4:59 PM IST

मुंबई - कंगनाच्या बोलण्याने महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे विचार संपणार (Gandhi's thoughts) नाही. जे प्रचारक आहेत जे अशा लोकांना पुढे करत आहेत. त्यांना कळले पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ठणकावून सांगितले आहे. महात्मा गांधी यांच्यावर टीका करणार्‍या कंगना रणौत (Kangana Ranaut) हिला मोजक्या शब्दात नवाब मलिक यांनी फटकारले आहे.

Nawab Malik : 'सुनियोजित पद्धतीने गांधीजींचे चारित्रहनन करण्याचा प्रयत्न सुरु'

'स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू'

नियोजन पध्दतीने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम आधीपासूनच सुरू आहे. खोटा इतिहास सांगणे, खोटी माहिती उपलब्ध करून देणे अशा पध्दतीने वारंवार असे लोक बोलत आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.

'तिचा बोलविता धनी कोण?'

कंगना रणौत हिने महात्मा गांधींजींचा अपमान करण्याचे काम केले केले आहे. अहिंसा हे विचार जगाने स्वीकारले आहेत. हिंसेने कुठलेही विषय सुटत नाही. त्यामुळे ठरवले तर अहिंसेच्या मार्गाने काहीही प्राप्त करु शकतो मात्र तिने बापूंचा अपमान का केला? आणि तिचा बोलविता धनी कोण? आहे हे देशाला माहीत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

'...तर ही तुमची चूक'

ज्या लोकांनी बापूंची हत्या केली तेपण बापूंना बगल देऊ शकत नाही. बापूंचे विचार देशात, जगात लोकांनी स्वीकारले आहेत. एखादी महिला बापूंच्या विरोधात बोलल्यावर लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतील हा कुणाचा समज असेल तर ती चूक आहे, असे स्पष्टपणे नवाब मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा - 'वेडे लोक बरळतात, त्यांना नशेचा पुरवठा कोण करतं, याचा शोध एनसीबीने घ्यावा'; संजय राऊतांचा कंगनावर घणाघात

Last Updated : Nov 17, 2021, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.