मुंबई - मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका अभिनेत्रीसोबत छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अभिनेत्रीने एका इंटिरियर डिझायनरविरोधात गुन्हा दाखल केला होता. ओशिवरा पोलिसांनी भादंविच्या कलम 354, 504, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला तरीही अद्याप अटक केली नाही.
या अभिनेत्रीला इंटिरियर डिझायनरने धमकीही दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि त्याची चौकशी करत आहे.पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्री तिच्या अंधेरीतील नवीन अपार्टमेंटमध्ये काम पाहण्यासाठी गेली होती. परंतु ते काम तिला आवडले नाही. अभिनेत्रीने डिझायनरला वाईट कामासाठी फटकारले. दोघांमध्ये वाद झाला. भांडण इतके वाढले की डिझायनरने अभिनेत्रीला अभद्र अपमानास्पद शब्द म्हटले, धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली आणि नंतर तिला धमकी दिली.
हेही वाचा - अफगाणिस्तानात महिलांच्या हक्कांचे उल्लंघन होण्याची भीती- संयुक्त राष्ट्रसंघाकडून चिंता व्यक्त