ETV Bharat / city

Chitra Wagh On Home Ministry : गृहमंत्रालय नेमके कोणाच्या इशाऱ्यावर काम करतेय?... चित्रा वाघ - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुख्यमंत्री उद्घव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल भाजप सोशल मीडिया प्रभारी ( BJP in charge of social media ) जितेन गजारिया यांच्यावर सायबर क्राईम सेल ने कारवाई सुरू केली आहे. यावरून भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ ( BJP vice president Chitra Wagh ) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांना खरमरीत पत्र लिहिले असून गृहमंत्रालय कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

CHITRA WAGH
चित्रा वाघ
author img

By

Published : Jan 7, 2022, 4:08 PM IST

मुंबई : चित्रा वाघ यांनी म्हणले आहे की, जितेन गजारिया यांच्या भाषेचे समर्थन करता येणार नाही. महिलांबद्दल अपशब्द वापरणा-यांवर कारवाई करायलाच हवी, यात दुमत नाही. पण मग संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना जाहीरपणे शिव्या दिल्या. लाईव्ह प्रेक्षपणाच्या माध्यमातून प्रत्येक घरात आक्षेपार्ह वक्तव्य पोहोचले. त्यावर गृहमंत्रालय मूग गिळून गप्प का बसलेय? गुलाबराव पाटील यांनी महिला खासदाराबद्दल अपशब्द वापरले. ते महिला लोकप्रतिनिधीची मानहानी करणारे नाही का ? मग गुलाबराव पाटलांवर अद्याप कारवाई का केली नाही. गृहमंत्री साहेब कायदा सर्वांसाठी समान आहे तर मग तो आपल्या वर्तणुकीतून दिसत का नाही ? संजयजी राऊत, गुलाबराव पाटलांना पाठीशी का घातले जातेय.. कारवाईसाठी आणखी किती वळसे घेणार आहात? हे आहे का, महाविकास आघाडीचे शिवशाही सरकार? माझा प्रश्न आहे की मुळात गृहमंत्री म्हणून आपले काही चालतेय का ? सबळ पुरावे समोर असतानाही आपण कारवाई करत नाही. एवढी हतबलता का आहे? गृहमंत्रालय नेमके कोणाच्या इशा-यांवर काम करतेय. जर जितेन गजारिया दोषी असतील तर राऊत, गुलाबराव पाटीलही दोषी आहेत आणि त्याहूनही अधिक त्यांना पाठीशी घालणारे गृहमंत्रालय दोषी आहे. आपल्याकडून कारवाईची अपेक्षा आहे. संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा. अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.

हेही वाचा : Offensive Post Against Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.