ETV Bharat / city

ST Workers Strike : 'निदान मुख्यमंत्र्यांचं तरी ऐका!'; एसटी संपावरून गोपीचंद पडळकरांचा शरद पवार यांच्यावर निशाणा - भाजप आमदाराची अनिल परब यांच्यावर टीका

एसटी संपाबाबत ( ST Workers Strike ) अजूनही अंतिम तोडगा निघत नसल्याने आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा ( Gopichand Padalkar criticized Sharad Pawar ) साधला आहे. काल मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहात एसटी संघटनाचे नेते तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांची शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार ( meeting on st workers strike mumbai ) पडली. या बैठकीमध्ये अंतिम तोडगा निघून संप मिटेल अशी आशा असतानासुद्धा अजूनही संप ताटकळत ठेवला गेला आहे. या कारणावरून आता गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार व अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

ST Workers strike
गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर टीका
author img

By

Published : Jan 11, 2022, 12:31 PM IST

मुंबई - एसटी संपाबाबत ( ST Workers Strike ) अजूनही अंतिम तोडगा निघत नसल्याने आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा ( Gopichand Padalkar criticized Sharad Pawar ) साधला आहे. काल मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहात एसटी संघटनाचे नेते तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांची शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार ( meeting on st workers strike mumbai ) पडली. या बैठकीमध्ये अंतिम तोडगा निघून संप मिटेल अशी आशा असतानासुद्धा अजूनही संप ताटकळत ठेवला गेला आहे. या कारणावरून आता गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार व अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

'दुसऱ्यांची दारं वाजवण्यापेक्षा तुम्ही स्वतः पुढे व्हा' -

परिवहन मंत्री अनिल परब यांना पडळकरांनी सल्ला दिला आहे. ते म्हणतात मंत्री अनिल परब यांनी माझी विनंती सोडा पण आपल्या मुख्यमंत्र्यांच तरी ऐका. इतरांना पुढे करण्याऐवजी तुम्ही स्वत: आझाद मैदानात जा व कर्मचाऱ्यांशी बोला. दुसऱ्याचे दरवाजे ठोठावण्या ऐवजी हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत? असा प्रश्नही पडळकर यांनी उपस्थित केला आहे. या दरम्यान पडळकर यांनी शरद पवारांचे नाव न घेता परिवहन मंत्र्यांनी पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वतः पुढे जाऊन संप मिटवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही केले आहे.

'निदान मुख्यमंत्र्यांचं तरी ऐका!'

पडळकर हे पुढे म्हटले की, कर्मचाऱ्यांनी कुठल्याही युनियनचे सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरदचंद्र पवार यांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले. आपल्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितले होत माझा मंत्री कोणत्याही आंदोलनाला मोर्चाला सामोर जाईल. मग आपण स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा, चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, असेही पडळकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Meeting on ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अनिल परब, शरद पवार यांची बैठक; सदावर्तेंच्या जागी नवे वकील, पवार म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.