ETV Bharat / city

Aslam Shaikh About Amol Kolhe : अमोल कोल्हे नथुराम गोडसेंच्या भुमिकेत; अस्लम शेख म्हणाले... - अमोल कोल्हे नथुरामच्या भुमिकेत

अमोल कोल्हे हे कलाकार आहेत. त्यांनी कुठला रोल केला तर ते राजकारणाची तुलना करणे योग्य नाही. आमचा नथुराम गोडसे बाबत बदल झालेला नाही. कलाकाराचा पैसा आणि रोल इतकाच संबंध असतो. अशी प्रतिक्रिया मंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी ( aslam shaikh about amol kolhe ) बोलताना दिली.

अस्लम शेख
अस्लम शेख
author img

By

Published : Jan 20, 2022, 6:15 PM IST

Updated : Jan 20, 2022, 8:00 PM IST

मुंबई - देशात सांप्रदायिकीकरणाचे काम कोण करत असले तर ते भाजप आणि केंद्र सरकार आहे. गोडसे तर एक लहान गोष्ट आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून काहीही घडू शकते. मात्र, राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेंची साकारलेली भूमिका राजकारणाशी जोडू नका. कलाकाराला पैसे आणि रोल महत्वाचा असतो, असे सांगत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोल्हे यांची पाठराखण ( aslam shaikh about amol kolhe ) केली.

अस्लम शेख यांची प्रतिक्रिया

कोल्हेच्या भुमिकेमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या -

'व्हाय आय किल्ड महात्मा गांधी' हा नथुराम गोडसेंवर आधारित नवा चित्रपट येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी गोडसेंची भूमिका साकारली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस कट्टर गोडसे विरोधक आहे. कोल्हे हे राष्ट्रवादीचे खासदार असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून विरोधाचे सूर उमटत आहेत.

'कलाकार आपली कलाकारी त्याला भेटले त्या रोलवर करतो'

कॉंग्रेसचे आमदार तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना प्रसार माध्यमांनी याबाबत विचारले असता ते म्हणाले की, कलाकाराला पोट महत्वाचे आहे. कलाकार आपली कलाकारी त्याला भेटले त्या रोलवर करतो. काय देवाचा रोल केला तर ते देव होऊन जात नाही. शेवटी ते कलाकारच असतात. व्हिलन असू द्या, डान्सर असू द्या, कॉमेडीयन असून द्या, कलाकार कलाकार असतो. त्याला कुठे राजकारणाशी जोडणे योग्य नाही. देशांमधील काही लोक आहेत, त्यांचा उघडपणे विचार बदलल्याचे दिसत आहे. तर भाजपच्या बऱ्याच नेत्यांचा आणि मंत्र्यांचा विचार बदलेला दिसतो आहे. मला नाही वाटत तुमच्या लोकांचा किंवा आमच्या लोकांचा गोडसे बद्दल विचार बदलल्याचा दिसतो आहे.” असेही मंत्री अस्लम शेख म्हणाले.

'...त्या लोकांना जास्त संधी देण्याचे काम भाजपा करते'

"ग्लोरी फाय करण्यासाठी राहिले काय? ज्या खासदारांवर दहशतवादाचे खटले सुरु आहेत. ते केंद्रात जाऊन बसले आहेत, निवडून आले आहेत. जे या देशाला जास्त त्रास देतात बदनाम करतात. त्या लोकांना जास्त संधी देण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत आहे. राज्य सरकारमध्ये असो की मग केंद्र सरकार .. हे जगजाहीर आहे.” असा आरोप मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे

हेही वाचा - Bawankule On Nana Patole : परमेश्वराने एक जीव नानांच्या रूपाने भूतलावर खोटं बोलण्यासाठीचं पाठवला- बावनकुळे

Last Updated : Jan 20, 2022, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.