मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनची कार्यकारणी निवडणूक २७ सप्टेंबर रोजी होत आहे. त्या अनुषंगाने भाजप नेते मुंबई अध्यक्ष, आशिष शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी गेले होते. परंतु तिथे उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींना पाहून त्यांनी त्यांची भेट न घेता तिथून माघारी परतले (Ashish Shelar reached Silver Oak). सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यातील संबंध फार मोठ्या प्रमाणामध्ये ताणले गेले आहेत. त्यामुळे या भेटीचा चुकीचा अर्थ निघू शकतो. याच कारणास्तव आशिष शेलार हे तिथून माघारी परतल्याचे समजते (returned back without meeting Sharad Pawar).
उलट सुलट चर्चांना वेग - मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी दक्षिण मुंबईतील त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवास्थानी जात होते. मात्र माध्यम प्रतिनिधींनी पाहिल्यानंतर त्यांनी ही भेट घेणं टाळलं. आशिष शेलार यांनी शरद पवारांच्या घरी न जाता बाहेरुनच आपला मोर्चा माघारी वळवला. विशेष म्हणजे आशिष शेलार यांनी या पद्धतीने शरद पवारांची भेट नाकारली कारण, सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही भेट झाली असती तर उलट सुलट चर्चांना उधाण आले असते.
एमसीए ची कार्यकारणी निवडणूक २७ सप्टेंबरला - शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर मुंबई क्रिकेट असोसिएशन कार्यकारिणीच्या निवडणुकीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशन कार्यकारणी निवडणूक २७ सप्टेंबरला होत आहे. या बैठकीला BCCI चे माजी सचिव प्रोफेसर रत्नाकर शेट्टी, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. पी व्ही शेट्टी आणि आशीष शेलारही उपस्थित राहणार होते. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कमालीचा राजकीय संघर्ष सुरू असताना आशीष शेलार यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला असता म्हणून त्यांनी ही भेट टाळल्याची माहिती आहे.
क्रिकेट क्षेत्रात शरद पवार यांचे वजन आहे. ते बीसीसीआयच नाही तर आसीसीचे अध्यक्षही राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या मताला क्रिकेट विश्वात आजही वजन आहे. याच अनुषंगाने क्रीडा क्षेत्रातील अनेक लोक शरद पवार यांची भेट घेत असतात. मात्र संदर्भ बदलल्याने ही भेट घेणे शेलार यांना सयुक्तिक वाटले नसावे असे दिसते.