ETV Bharat / city

Ashish Shelar Critisize Shivsena : शिवसेनेचे मुंबईकरांवरच प्रेम बेगडी; आशिष शेलार यांची टीका - मुंबई महापालिका करमाफी

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांसाठी ५०० चौरस ( Property tax waived ) फूटांपर्यंत घरांच्या कर माफीची घोषणा केली. ही घोषणा म्हणजे केवळ धूळफेक असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार ( Ashish Shelar Critisize Shivsena ) यांनी केली आहे.

Ashish Shelar Critisize Uddhav Thackeray

author img

By

Published : Jan 2, 2022, 3:29 PM IST

Updated : Jan 2, 2022, 7:26 PM IST

मुंबई - नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांसाठी ५०० चौरस ( Property tax waived ) फूटांपर्यंत घरांच्या कर माफीची घोषणा केली. ही घोषणा म्हणजे केवळ धूळफेक असून जर खरोखर शिवसेनेला मुंबईकरांची चिंता असेल तर त्यांनी जेव्हा निवडणुकीच्या सुरुवातीला २०१७ ला घोषणा केली होती, तेव्हापासून आतापर्यंतचा ४ वर्षांचा कर माफ करावी व ते पैसे मुंबईकरांना परत द्यावेत, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार ( Ashish Shelar Critisize Shivsena ) यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

'मागील ४ वर्षाचे करांचे पैसे मुंबईकरांना परत द्या' -

मुंबई महानगरपालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) २०१७च्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेने मुंबईकरांना ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांची कर माफी करण्याची घोषणा केली होती. याबाबत काल निर्णय घेण्यात आला. परंतु याबाबत ४ वर्ष उशीर का झाला? अशी विचारणा करत निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना आमिष दाखवण्याचे काम शिवसेनेने केल आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेचे मुंबईकरांवरचे प्रेम हे बेगडी असून ते पुतणा मावशीच प्रेम आहे. कोरोनाकाळात ज्या वेळी सरकारी तिजोरीत खडखडाट होता. तेव्हा शिवसेनेने सर्वात अगोदर आपल्या बिल्डर मित्रांना खुश करण्यासाठी त्यांना प्रोजेक्टमध्ये प्रीमियममध्ये सूट मिळावी, यासाठी ११ हजार कोटींची सूट दिली. त्यावेळेला सुद्धा त्यांना ५०० चौरस फूट घरात राहणाऱ्या मुंबईकरांची आठवण झाली नाही. मुंबईतील पब, बार, रेस्टॉरंट यांचे मालक शिवसेनेचे मित्र आहेत म्हणून त्यांच्या लायसन्स फीमध्ये सुद्धा सूट देण्यात आली. विदेशी दारूवर ५०% कर सवलत देण्यात आली. वाईनरी वाइन्स बनवण्यात सवलत दिली गेली, या सर्व गोष्टी करत असताना शिवसेनेला ५०० चौरस फूट राहणाऱ्या मुंबईकरांची आठवण का झाली नाही? असा प्रश्न विचारत मुंबई महानगरपालिकेची येणारी निवडणूक लक्षात घेऊन हे करण्यात आले आहे, असा आरोपही शेलार यांनी केला आहे.

'मध्यमवर्गीय व व्यापाऱ्यांना ही सवलत द्या' -

निवडणुकीच्या तोंडावर आता मुंबईकर आठवले असून जेव्हापासून ही घोषणा केली, तेव्हापासून मागील ४ वर्षाचे कराचे पैसे मुंबईकरांना परत द्या, असं सांगत कोरोनाकाळात मध्यमवर्गीयांना पण याचा फटका बसलेला आहे. त्यामुळे ज्यांचे घर ७००-८०० चौरस फूट असेल त्यांना सुद्धा ५०० फुटापर्यंत सूट देऊन इतर फुटांचे पैसे त्यांच्याकडून घ्यावेत त्यांच्यावर अन्याय करू नये, असंही शेलार म्हणाले. मुंबईतील दुकानदार व व्यापारी यांचे छोटे छोटे गाळे, दुकान जर ५०० चौरस फुटापर्यंत असतील, तर त्यांना सुद्धा सूट द्यावी. जेणेकरून छोटे छोटे व्यापारी, बलुतेदार यांच्यावर अन्याय होणार नाही, अशी मागणीही अशिष शेलार यांनी केली आहे.

हेही वाचा - Raosaheb Danve On shivsena : "शिवसेनेत आग लावण्याचे काम माझं नाही"

Last Updated : Jan 2, 2022, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.