ETV Bharat / city

ठेकेदारांनी नाल्यांची सफाई नव्हे तर हातसफाई केली, आशिष शेलारांचा आरोप - मुंबई नालेसफाई न्यूज

मुंबईत पडत असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. त्यामुळे ठेकेदारांनी नाल्यांची सफाई नव्हे तर हातसफाई केल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

mumbai
ठेकेदारांनी नाल्यांची सफाई नव्हे तर हातसफाई केली, आशिष शेलारांचा आरोप
author img

By

Published : Jul 15, 2020, 4:06 PM IST

मुंबई - जोरदार बरसणाऱ्या पावसाने पालिकेचा ११३ टक्के नालेसफाईचा दावा फोल ठरवला आहे. मुंबईत पडत असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. त्यामुळे ठेकेदारांनी नाल्यांची सफाई नव्हे तर हातसफाई केल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबईत 113 टक्के नालेसफाई झाल्याच्या आयुक्तांनी दावा केला होता. या दाव्याचे पावसाने अखेर तीन तेरा वाजवले. हे होणारच होते, कारण 40 टक्केपेक्षाही जास्त नालेसफाई झालेली नसल्याचे शेलार म्हणाले. कोट्यवधीची कंत्राटे देऊन कंत्राटदारांची पाठराखण करणारे सत्ताधारी आता गायब असल्याचा टोलाही आशिष शेलार यांनी महापालिकेला लगावला.

कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून मुंबईत सुरू झाला. त्यामुळे पावसाळीपूर्व कामे लांबणीवर पडली. दरवर्षी, नालेसफाईचे काम एप्रील महिन्यापासून सुरू होते. परंतु, यंदा कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढ्यात पालिकेची यंत्रणा व्यस्त होती. परिणामी, नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम मे महिन्यात सुरू झाले. जून महिना कोरडा गेल्याने नाल्यांचे काम पूर्ण करून घेण्याचा अवधी पालिकेला मिळाला. मात्र, पालिकेने 113 टक्के काम केल्याचा दावा केला. मग या पावसात पाणी का तुंबले? कोट्यवधीची कंत्राटे देऊन कंत्राटदारांची पाठराखण करणारे सत्ताधारी आता गायब का? असा प्रश्न शेलार यांनी सत्ताधाऱ्यांना केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.