ETV Bharat / city

Maratha Reservation : राज्य सरकारने शब्द पाळला नाही म्हणून, आमरण उपोषणाचा निर्णय : छत्रपती संभाजीराजे

मराठा आरक्षणासह ( Maratha Reservation ) विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे हे आझाद मैदानात ( Aazad Maidan Mumbai ) उपोषणाला बसले ( Chhatrapati Sambhajirajes Fast Till Death ) आहेत. उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. तसेच राज्य सरकार गंभीर नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीराजे
छत्रपती संभाजीराजे
author img

By

Published : Feb 26, 2022, 1:58 PM IST

मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मुद्द्यावरून आज मुंबईतील आजाद मैदान ( Aazad Maidan Mumbai ) येथे आमरण उपोषणाला सुरुवात ( Chhatrapati Sambhajirajes Fast Till Death ) केली. 17 जूनला राज्य सरकार सोबत चर्चा केली होती. पंधरा दिवसात राज्य सरकार कडील सर्व मागण्या मार्गी लावू असे आश्वासन त्यावेळी देण्यात आलं होतं. मात्र अद्यापही त्याच मागण्या घेऊन उपोषणाला बसावे लागत आहे अशी खंत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. उपोषण सुरू करण्याआधी छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषणस्थळी पत्रकारांशी संवाद साधत राज्य सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली.

छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नीही उपोषणस्थळी पाठिंबा देण्यासाठी आल्या आहेत.

महाराष्ट्रातील वातावरण बदललं

2013 पासून मराठा आरक्षणासाठी लढत असणाऱ्या सर्व संघटना एकत्र आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व आपण करावे अशी विनंती या संघटनांकडून करण्यात आली असल्याचं यावेळी छत्रपतींनी सांगितले. आपण केवळ मराठा समाजाचेच नाही तर, बारा बलुतेदार, अठरापगड जातींचे प्रतिनिधित्व करत आहोत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण उपोषण करणार आहोत असे समजतात गेल्या दहा दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण बदललं असल्याच यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

राज्य सरकारकडे केलेला मागण्या अगदी छोट्या

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारने काही सुविधा मराठा समाजाला देण्यात यावा यासाठी मागण्या करण्यात आल्या होत्या. अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत मराठा समाजातील शेकडो तरुणांना रोजगार मिळू शकतो. मात्र अद्याप त्याबाबत राज्य सरकारने काहीही केले नाही. तसेच सारथी संस्थेसाठी पुणे आणि कोल्हापूर येथे राज्य सरकारने पावले उचलली असली तरी, अद्याप त्या संस्थेवर संचालक नाहीत. मूलभूत सुविधा देखील मिळत नाही. मराठा समाजातील आंदोलकांवर असलेले गुन्हे देखील अद्याप मागे घेतले गेले नाहीत. एमपीएससीमधील मराठा समाजातील तरुणांचा प्रश्न अद्यापही तसाच आहे. कोपर्डी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात गुन्हेगार गेले आहेत. मात्र त्यातही राज्य सरकारकडून काय हालचाली केल्या गेल्या नाहीत. अशा काही मागण्यांचा पाढा यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत वाचला. या मागण्या राज्य सरकारला सहज पूर्ण करणे शक्य आहे. मात्र यातही राज्य सरकार गंभीर नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून संपर्क

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण उपोषण करणार आहोत हे राज्य सरकारला माहित आहे. या मागण्यासंबंधी आपण राज्य सरकारकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र आता याच मुद्द्यांवर राज्य सरकारला काही चर्चा करायची असल्यास त्यांनी उपोषण स्थळी यावे, असा इशाराही छत्रपती संभाजी राजे यांनी दिला. तसेच आपण उपोषणाला बसण्याचे ठरल्यावर आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.