मुंबई - महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगावरील रिक्त असलेल्या अध्यक्ष आणि दोन सदस्यांच्या नियुक्तीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी ज. मो अभ्यांकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या कामाला आता पुन्हा एकदा वेग येईल, असा विश्वास सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कोण आहेत ज. मो. अभ्यंकर?
ज मो अभ्यंकर यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष पद भूषवले आहे. तसेच शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ते प्रांताध्यक्षही आहेत. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे असलेल्या कामाचा दांडगा अनुभव पाहता या पदाला न्याय देतील असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
कोणाची झाली नियुक्ती?
ज. मो अभ्यंकर यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी पुढील दीड वर्षाच्या कालावधी करीता नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणार आहे. तसेच सदस्य म्हणून आर. डी. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर किशोर मेढे यांची सामाजिक आणि आर्थिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या दोन्ही नियुक्त्या पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहेत.
हेही वाचा - खरी लढाई आता विधानसभेत, भाजपा नेते रस्त्यांवर फिरु शकणार नाही; नवाब मलिकांचा इशारा