ETV Bharat / city

आर्यन खानचा जेलमधील मुक्काम वाढला, जामीन अर्जावर बुधवारी होणार सुनावणी

author img

By

Published : Oct 11, 2021, 11:11 AM IST

Updated : Oct 11, 2021, 2:12 PM IST

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेला यांच्या जामीन अर्जावर आज दुपारनंतर सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, जामीन अर्जावर रितीसर उत्तर देण्यासाठी एनसीबीने वेळ मागितल्याने आजची सुनावणी सत्र न्यायालयाने तहकुब केली आहे. आता बुधावरीपर्यंत एनसीबीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला आहे. बुधावरी सकाळी एनसीबी आपला अहवाल सत्र न्यायालयात सादर करणार आहे. त्यानंतर बुधावरी दुपारी आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता

मुंबई - ड्रग्ज पार्टीतील कारवाईत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेला यांच्या जामीन अर्जावर आज दुपारनंतर सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, जामीन अर्जावर रितीसर उत्तर देण्यासाठी एनसीबीने वेळ मागितल्याने आजची सुनावणी सत्र न्यायालयाने तहकुब केली आहे. आता बुधावरीपर्यंत एनसीबीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला आहे. बुधावरी सकाळी एनसीबी आपला अहवाल सत्र न्यायालयात सादर करणार आहे. त्यानंतर बुधावरी दुपारी आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डींया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. त्यानंतर, आर्यन खानसह अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना काला किल्ला कोर्टात हरज करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने (7 ऑक्टोबर)पर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती.

आर्यनकडे काहीही मिळाले नाही

आर्यन खानसह आठ आरोपींच्या जामीन अर्जावर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लनेड यांच्या कोर्टात दुपारी सुनावणी झाली. यावेळी एनसीबीच्या वकिलांनी आर्यन खान, अरबाज मर्चंट तसेच मुनमुन यांना जामीन दिल्यास पुरावे मिटवले जाण्याची शक्यता असल्याने त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तिवाद केला होता. यावर आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी, कमी प्रमाणात ड्रग्स पकडले तरी त्या लोकांशी कशा प्रकारचा व्यवहार केला जातो याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा दाखला दिला होता. तसेच, उच्च न्यायालये अशा आरोपींना जामीन मंजूर करण्यात उदार आहेत. परंतु तक्ररदार अजूनही जामिनाला विरोध करत आहेत. आर्यनकडे काहीही मिळाले नाही तरीही त्याचे भांडवल केले जात आहे. जर न्यायालयाने जामीन अर्जांच्या स्थिरतेवर निर्णय घेण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या अंतरिम जामीन अर्जावर निर्णय घ्यावा असे म्हणाले होते.

तो एनसीबीला सहकार्य करत आहे

आपण तांत्रिकतेवर उभे राहू नये, गुणवत्तेवर जाऊया. कारण गुणवत्तेशिवाय तांत्रिकतेचा उपयोग नाही. आर्यन खान २३ वर्षाचा आहे. तो बॉलिवूडमधील असल्याने तो तिथे गेला. त्याच्याकडे काही ड्रग्स आहेत का असे विचारले असता त्याने आपल्याकडे ड्रग्स नसल्याचे सांगितले आहे. आर्यन एका श्रीमंत कुटुंबातील सदस्य आहे. याचा अर्थ असा नाही की तो पुराव्यांशी छेडछाड करेल. त्याने आतापर्यंत तपास यंत्रणेवर कोणताही प्रभाव पाडलेला नाही. गेल्या सहा दिवसांपासून तो एनसीबीला सहकार्य करत आहे. यामुळे आर्यनला जामीन द्यावा, अशी मागणी आर्यनचे वकील मानेशिंदे यांनी केली होती.

हेही वाचा - हिंदू मुली आणि मुलांचे धर्मांतर करणे चुकीचे - मोहन भागवत

Last Updated : Oct 11, 2021, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.