ETV Bharat / city

Aryan Khan Drug Case आर्यन खानच्या जामिनावर आज पुढील सुनावणी

आर्यन खानवरील जामिनावर होणारी सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने काल बुधवार (दि.27) पुन्हा पुढे ढकलली. त्यावर आज गुरुवारी(दि.28) सुनावणी होणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीनावर ही सुनावणी सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ वकील आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. मात्र, वेळेत युक्तीवाद पुर्ण न झाल्याने सुनावणी पुढे ढकलली. दरम्यान, आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

Aryan Khan Drug Case आर्यन खानच्या जामिनावर आज पुढील सुनावणी
Aryan Khan Drug Case आर्यन खानच्या जामिनावर आज पुढील सुनावणी
author img

By

Published : Oct 28, 2021, 7:35 AM IST

मुंबई - क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानवरील जामिनावर होणारी सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने काल बुधवार (दि.27) पुन्हा पुढे ढकलली. त्यावर आज गुरुवारी(दि.28) सुनावणी होणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीनावर ही सुनावणी सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ वकील आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. मात्र, वेळेत युक्तीवाद पुर्ण न झाल्याने सुनावणी पुढे ढकलली. दरम्यान, आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

...तर मग आरोपींची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाही?

या सुनावणीत एनसीबीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी हे प्रकरण कोणत्याही षडयंत्राचे नसून व्यक्तीगत सेवनाच्या आरोपांचे आहे असे म्हणणे मांडले आहे. दरम्यान, ड्रग्ज सेवन झाले होते, तर मग आरोपींची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाही? असा प्रश्न एनसीबीकडे उपस्थित करण्यात आला आहे.

कायद्यानुसार अटकेसाठी वस्तूस्थिती नोंदवावी लागते

एनसीबीच्या अटक नोटीसीमध्ये मुद्दे वेगवेगळ्या स्वरुपाचे मांडण्यात आले आहेत. कायद्यानुसार अटकेसाठी वस्तूस्थिती नोंदवावी लागते. अटकेचा अधिकार समजून घेण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम ५० समजून घ्यावे लागते. तसेच, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या अटकेबाबत माहिती दिली पाहिजे. आणि अटक करताना त्या व्यक्तीला जामिनाचा अधिकार असतो. भारतीय संविधानाचे कलम २२ हे कलम २१ मधील जीवनाचा अधिकारावर अवलंबून आहे. असही रोहतगी म्हणाले आहेत.

माहिती न देता माझी दिशाभूल करत आहेत

दरम्यान, माझ्याकडे एनसीबी उल्लेख करत असलेल्या व्हॉट्सअॅप चॅटची तपशील नाही. त्यामुळे मी अस्वस्थ आहे. एनसीबीकडे त्या चॅटसह जप्त केलेल्या गोष्टींचा तपशील आहे. पण ते त्याविषयी माहिती न देता माझी दिशाभूल करत आहेत. त्यांनी जप्त केलेल्या गोष्टी आर्यन किंवा अरबाजकडे सापडल्या असे कुणालाही वाटू शकते. पण प्रत्यक्षात आर्यनकडून काहीही जप्त करण्यात आलेले नाही असही रोहतगी म्हणाले आहेत.

दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला

एनसीबीने २ ऑक्टोबरला मुंबईत कॉर्टेलिया क्रूझवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत, एनसीबीने ८ लोकांना अटक केली आहे. अटकेनंतर हे सर्वजण तुरुंगातच आहेत. त्यांच्या जामीनावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू असताना मंगळवारी (२६ ऑक्टोबर) दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काहीवेळा गर्दीचा अडथळा निर्माण झाल्याने सुनावणी थांबवावी लागली

या प्रकरणामध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज विशेष सत्र न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी सुरू आहे. दोन दिवसांपासून युक्तीवाद सुरू आहे. सुनावणीवेळी काहीवेळा गर्दीचा अडथळा निर्माण झाल्याने सुनावणी थांबवावी लागली तर काही वेळा युक्तीवादाला वेळ जास्त लागल्याने सुनावणी थांबवण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवसी पुन्हा सुनावणी होत आहे.

हेही वाचा - Aryan Khan Drug Case : आजची रात्र कारागृहातच, कोर्टाचे कामकाज संपल्याने सुनावणी उद्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.