मुंबई - प्रभाकर साईल यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेत कोर्टाने दखल घेऊ नये अशी मागणी असलेल्या वानखेडे यांच्या अर्जावर आदेश देण्यास मुंबईतील NDPS कोर्टाने नकार दिला आहे. NCB ने आज सकाळी अर्ज दाखल केला होता की, कथित प्रतिज्ञापत्राची दखल घेतली जाऊ नये. न्यायालय किंवा सक्षम अधिकार क्षेत्राच्या न्यायालयाने निर्देशित केलेल्या फॉर्म किंवा पद्धतीशिवाय कोणत्याही प्रकारे त्याचा वापर केला जाऊ नये, मात्र असा निर्देश देता येत नसल्याचे सांगून आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला.
समीर वानखेडेँच्या अडचणीत वाढ; संरक्षण देण्यास NDPS कोर्टाकडून नकार - etv news live
17:19 October 25
समीर वानखेडेँच्या अडचणीत वाढ; संरक्षण देण्यास NDPS कोर्टाकडून नकार
16:10 October 25
समीर वानखेडेंची होणार डिपार्टमेंटकडून चौकशी
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा देखील त्यांच्यावर आरोप झाला आहे. समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर वेळोवेळी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई संशयास्पद असल्याचा आरोपी महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे.
वानखेडे यांची चौकशी
यानंतर आता समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उद्या एनसीबीचं दिल्लीतील एक पथक मुंबईला येणार आहे. या पथकात NCB चे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्यासह अन्य दोन इन्स्पेक्टर पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. प्रभाकर साईलची संरक्षणाची मागणी
दुसरीकडे, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल यांनी सोमवारी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या सहआयुक्तांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून त्यामध्ये त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोवर खंडणी वसूल करण्याचा आरोप केले आहेत. तसेच समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील त्यांनी रविवारी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.
कोण आहेत समीर वानखेडे?
महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
कोणकोणत्या पदांवर काम -
2008 ते 2021 पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
आर्यन खान प्रकरणी नवा खुलासा -
या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीचा बॉडीगार्ड असलेल्या प्रभाकर साईल नावाच्या व्यक्तीने एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्याने म्हटलंय की, गोसावीच्या सांगण्यावरुनच तो पिवळ्या गेटजवळ गेला होता. समीर वानखेडे यांना 8 कोटी रुपये द्यायचे आहेत, असं म्हणताना त्याने ऐकल्याचा दावा केला आहे. एनसीबीने त्यांना साक्षीदार बनवून 10 कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. तसेच पैशांनी भरलेल्या बॅगेचा उल्लेख देखील केला असल्याचा खुलासा त्याने केला आहे. समीर वानखेडे आणि किरण गोसावी यांच्यावर त्याने वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत.