ETV Bharat / city

Aryan Khan Drugs Case : काय आहे आर्यन खान क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरण?, वाचा सविस्तर...

NCB कडून मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) एनडीपीएस कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये सहा आरोपींना NCB कडून क्लीनचिट ( Clinchit 6 accused in Cruise Drugs Party case ) देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ( Shah Rukh Khan son Aryan Khan Clinchit ) याला देखील क्लीनचिट देण्यात आली आहे.

Aryan Khan Drugs Case
Aryan Khan Drugs Case
author img

By

Published : May 27, 2022, 3:34 PM IST

मुंबई - मुंबई कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून 2 ऑक्टोंबर रोजी जहाजवर धाड टाकत त्यामध्ये 20 आरोपींना पकडण्यात आले होते. यामध्ये या प्रकरणाला 235 दिवसनंतर आज NCB कडून मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) एनडीपीएस कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये सहा आरोपींना NCB कडून क्लीनचिट ( Clinchit 6 accused in Cruise Drugs Party case ) देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ( Shah Rukh Khan son Aryan Khan Clinchit ) याला देखील क्लीनचिट देण्यात आली आहे.

मुंबईत कॉर्डेलिया क्रुझ जहाज मुंबईवरून गोव्याकडे 2 ऑक्टोंबर रोजी जाणाऱ्या या जहाजमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जहाज मुंबईवरून निघाले असता नारकोटिक्स ब्यूरोचे अधिकारी या जहाजावर पहिल्यापासूनच वेषांतर करून प्रवेश घेतला होता. जहाज सायंकाळी पाचच्या सुमारास माजगाव डॉग येथून निघाली. जहाज जशी गोव्याच्या दिशेने जात होती. पार्टी रंगात येत असतानाच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या पार्टीवर धाड टाकत चौकशी सुरू केली. या चौकशी दरम्यान जहाजवरील 20 संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र या 20 संशयित आरोपीमध्ये बॉलिवूडचा शहेनशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे नाव समोर आल्याने संपूर्ण देशभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

या प्रकरणातील आरोपी आणि झालेली कारवाई :

आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, मोहक जसवाल, विक्रांत चोकर, नुपूर सतीजा, गोमित चोप्रा, इश्मीत सिंग, अब्दुल कादिर, श्रेयस नायर, मनीष राजगरिया, अवीन साहू, गोपाल आनंद, समीर सैगल, मानव सिंघल, भास्कर अरोरा

2 ऑक्टोबर (शनिवार रात्री): एनसीबीने टर्मिनलवरून निघालेल्या क्रूझ जहाजावर छापा टाकला. खानला जहाजात चढण्याआधीच टर्मिनलवर अडवण्यात आले आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी आणि शोध घेतला. अशी चौकशी केल्यानंतर, त्याला एनसीबी कार्यालयात नेण्यात आले जेथे त्याला पुढील तारखेपर्यंत ताब्यात घेण्यात आले.

3 ऑक्टोबर: रविवारी दुपारपर्यंत, NCB ने प्रथम माहिती अहवाल, 2021 चा FIR क्रमांक 94 नोंदवला ज्यामध्ये खान मुख्य आरोपी होता. त्याच्या अटकेच्या वृत्ताला दुपारी ३ वाजता अधिकृत दुजोरा मिळाला. सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह खानला सायंकाळी 7 नंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (ACMM) आर के राजेभोसले यांच्यासमोर रिमांडसाठी हजर करण्यात आले. संक्षिप्त सुनावणीनंतर खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली.

4 ऑक्टोबर: खान आणि इतर दोन सहआरोपींच्या कोठडीत 7 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढ करण्यात आली. इतर पाच आरोपी होते ज्यांना एनसीबीने हजर केले होते आणि एसीएमएम आरएम नेर्लीकर यांनी त्यांची एनसीबी कोठडीत रवानगी केली होती. मोहक जसवाल, विक्रांत चोकर, नुपूर सतीजा, गोमित चोप्रा आणि इश्मीत सिंग हे पाच जण होते.

5 ऑक्टोबर : एनसीबीने या प्रकरणात आणखी चार आरोपींना रिमांडसाठी हजर केले. अब्दुल कादिर, श्रेयस नायर, मनीष राजगरिया आणि अवीन साहू हे आरोपी होते.
या चौघांना 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली.

6 ऑक्टोबर : क्रूझवरून अटकेचा सिलसिला सुरू ठेवत, NCB ने आणखी चार जणांना अटक केली. जे कथितरित्या क्रूझवरील कार्यक्रम पार्टीसाठी आयोजक संघाचा भाग होते. आरोपी गोपाल आनंद, समीर सैगल, मानव सिंघल आणि भास्कर अरोरा यांना 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली.

8 ऑक्टोबर : आर्यन खान सह आणखी दोन आरोपींची जामीन अर्जावर न्यायाधीश नेर्लीकर यांनी सुनावणी घेतली. सुमारे 5 तास चाललेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर त्यांनी अर्ज फेटाळून लावले.

13 ऑक्टोबर :आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी आपण 20 ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान आर्यन खानला विशेष न्यायालयाने जामीन नाकारला होता. आर्यन खान, आविन साहू, गोपाळ जी आनंद, समीर सेहगल, भास्कर अरोडा, मानव सिन्हा या सहा आरोपी बद्दल पुरव्या अभावी सुटका करण्यात आली.

आर्यनला शाहरुख खानकडून मनी ऑर्डर : जेलमध्ये ११ ऑक्टोबरला आर्यन खानला साडे चार हजार रुपयांचं मनी ऑर्डर आले. आर्यनला हे पैसे त्याचे वडील म्हणजेच अभिनेता शाहरुख खानने पाठवले. मनी ऑर्डरने आलेल्या या पैशांचा वापर आर्यन कॅन्टीनमधील जेवणासाठी करु शकतो. तसेच तुरुंगातील नियमांनुसार कैदींना पैसे हे फक्त मनी ऑर्डरने पाठवले जाऊ शकतात आणि त्यासाठी ४ हजार ५०० रुपये ही जास्तीत जास्त रक्कम आहे. तसेच ही रक्कम महिन्यातून एकदाच पाठवता येते. त्यामुळे कोणत्याही कैदीचे घरचे याहून जास्त पैसे मनी ऑर्डरद्वारे पाठवू शकत नाही.

नवाब मलिकांचा पंच संदर्भात NCB ला प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात एनसीबीच्या कामावर संशय व्यक्त करून काही साक्षीदारांची नावे उघड करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. एनसीबीच्या कारवाईत या खाजगी लोकांचे काय काम होते, हे खासगी लोक आरोपींना कसे काय हाताळू शकतात असा सवाल केला होता. याच्यावर एनसीबीचे अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन हे लोक क्रूझ प्रकरणातील गुन्ह्यातील साक्षीदार असून असल्याचे स्पष्ट केल्यानंतर मलिक यांनी आणखी एका व्यक्तीचे फोटो व्हायरल करून हे व्यक्ती एनसीबीच्या तीन गुन्ह्यात पंच कसे राहू शकतात, असाही सवाल उभा करून या साक्षीदारांचे नाव उघड केले होते.

19 दिवसानंतर शाहरुखने आर्यनच्या भेटीकरिता आर्थर रोड जेलमध्ये : आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यापासून शाहरुख खान आपल्या मुलाला भेटला नव्हता. आर्यन खान संदर्भात अनेक बातम्या प्रसारमाध्यमात येत होत्या. मात्र आर्यन खानचे जामीन अर्ज दोन्ही न्यायालयाने फेटाळल्यानंतर तब्बल गेल्या 19 दिवसानंतर बॉलिवूडचा शहेनशहा शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानला भेटण्याकरिता सकाळी नऊ वाजता आर्थर रोड जेलमध्ये दाखल झाला होता. आर्यन खान आणि शाहरुख खानची 10 मिनिट फोनद्वारे एकमेकाशी बोलणे झाले होते.

25 दिवसानंतर आर्यनला जामीन मंजूर : गेल्या 25 दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर 28 ऑक्टोंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला होता.

NCB SIT ची स्थापना : 25 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा गौप्यस्फोट पंच प्रभाकर साईला यांनी केल्या नंतर दिल्लीतून एक चौकशी टीम मुंबईत आली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणासह इतर 5 प्रकरणातून वगळण्यात आले होते. त्यानंतर या 6 केसचा तपास IPS संजय सिंग दिल्लीतील एसटीचे प्रमुख यांना देण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास संजय सिंग करत आहे. याच टीमने पुन्हा 90 दिवसाची आरोपपत्र दाखल करण्याकरिता वाढी वेळ मागितली आहे.

हेही वाचा - Aryan Khan : आर्यन खानला कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून क्लीन चिट..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.