मुंबई - क्रूझ ड्रग्ज प्रकरणात जामीन देताना आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना न्यायालयाने काही अटीवर जामीन ( Aryan Khan was released on bail ) दिला होता. दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी एनसीबी कार्यालयात आज ( शुक्रवारी ) हजेरी ( Aryan Khan attended NCB office ) लावली. दरम्यान आर्यन खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली ( Aryan Khan Going High Court ) आहे. जामीन देताना घालण्यात आलेल्या अटी शितल करण्यात यावा यासाठी त्याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्यन खानच्या अर्जावर न्यायालयात 13 डिसेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुनमुन धामेचा यांनी देखील अटी शिथिल करण्यास संदर्भात याचिका दाखल केलेली आहे.
दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी -
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात जामीन देताना आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी एनसीबी कार्यालयात शुक्रवारी हजेरी लावली. हजेरी लावताना प्रत्येक वेळी त्याला जामिनाचे कागदपत्र सादर करून एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते.
नेमके काय आहे प्रकरण ?
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला एनसीबीने क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर छापा मारला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळल्याचा एनसीबीचा दावा आहे. याच प्रकरणात त्यावेळी आर्यनसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. पुढे तब्बल 27 दिवसानंतर आर्यन खानची 30 ऑक्टोबर रोजी आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती. उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार त्याला प्रत्येक शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागत आहे.
हेही वाचा - Omicron Patient in Dharavi : टांझानियामधून धारावीत आलेला रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह