ETV Bharat / city

वानखेडेंच्या चौकशीसाठी दोन एसआयटीची स्थापना; नवाब मलिक यांचे ट्विट - एसआयटी

आर्यन खानचे अपहरण केलं आणि खंडणी याप्रकरणातील तपास केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून व्हावा अशी याचिका मीच न्यायालयात दाखल केली होती, असा दावा केला. यावर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांनी आणखी एक टि्वट केले असून वानखेडेंना लक्ष्य केले आहे. समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं.

वानखेडेच्या चौकशीसाठी दोन एसआयटीची स्थापना; नवाब मलिक यांचे ट्विट
Aryan Khan Case,Nawab Malik, S.I.T probe,Nawab Malik on SIT probe
author img

By

Published : Nov 6, 2021, 9:44 AM IST

मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्या हातातून काढून घेण्यात आला आहे. यावर आपल्याला तपासातून काढण्यात आले नाही. प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून व्हावा अशी याचिका मीच न्यायालयात दाखल केली होती, असा दावा केला. यावर आज सकाळी नवाब मलिकांनी आणखी एक टि्वट केले असून वानखेडेंना लक्ष्य केले आहे. समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं.

समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी आपणच केली होती असा दावा केला आहे. आर्यन खानचे अपहरण केलं आणि खंडणी मागितली या प्रकरणी समीर वानखेडेंची चौकशी करावी अशी मागणी केली होती. आता केंद्र आणि राज्य अशा दोन एसआयटी स्थापन झाल्या आहेत. या दोन्ही पैकी कोण समीर वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचा खरा चेहरा समोर आणतं ते पाहुयात असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

मुंबई एनसीबीकडे असलेल्या सहा प्रकरणाचा तपास एनसीबीचे एसआयटी पथक करणार आहे. एनसीबीच्या महासंचालकांकडून हे एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच तपास करण्यात येत असलेल्या या प्रकरणांच्या तपासातून कोणत्याही अधिकाऱ्याला काढण्यात आलेले नाही, आधीचे सर्व अधिकारी तपासात असतील, असे स्पष्टीकरण एनसीबी दिल्लीकडून देण्यात आले आहे.

समीर वानखेडे अमली पदार्थ प्रकरणांचे स्पेशालिस्ट

समीर वानखेडे एनसीबीच्या मुंबई कार्यालयातील प्रादेशिक संचालक आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीवर बदली झाली होती. अमली पदार्थांशी निगडीत प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नेतृत्वात एनसीबीने कोट्यवधींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

2004 मधील बॅचचे आयआरएस अधिकारी

समीर वानखेडे हे मूळचे महाराष्ट्रातील असून 2004 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. सुरूवातीला त्यांची मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. कामातील नैपुण्य बघून त्यांना विभागाने काही प्रकरणांच्या तपासासाठी आंध्र प्रदेश आणि दिल्लीतही पाठविले होते. अमली पदार्थांशी निगडीत बाबींचे तज्ज्ञ म्हणून वानखेडेंची ओळख आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये मुंबईतील एका ड्रग्स प्रकरणाशी निगडीत कारवाईदरम्यान समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर हल्लाही झाल्याचे काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.