ETV Bharat / city

ड्रग प्रकरणी आर्यन खानच्या बँक खात्यांचा एनसीबीकडून तपास

author img

By

Published : Oct 23, 2021, 3:09 PM IST

ड्रग प्रकरणी आता आर्यन खानच्या बँक खात्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. ड्रग घेण्यासाठी त्याने स्वतः पैसे खर्च केलेत का? हे तपासण्याचे काम सुरू आहे. एनसीबी अधिकारी स्वतः याचा तपास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चौकशी करिता एनसीबी अधिकाऱ्यांकडून काही प्रश्नांची यादी तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार आता एनसीबी अधिकारी तपास करणार आहे.

Aryan Khan bank accounts ncb etvbharat
आर्यन खान खाते तपास एनसीबी

मुंबई - ड्रग प्रकरणी आता आर्यन खानच्या बँक खात्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. ड्रग घेण्यासाठी त्याने स्वतः पैसे खर्च केलेत का? हे तपासण्याचे काम सुरू आहे. एनसीबी अधिकारी स्वतः याचा तपास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चौकशी करिता एनसीबी अधिकाऱ्यांकडून काही प्रश्नांची यादी तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार आता एनसीबी अधिकारी तपास करणार आहे. मुंबई क्रुझ ड्रग पार्टीप्रकरणी आर्यन खानला 2 ऑक्टोबर रोजी अटक झाली होती. तेव्हापासून तो सुरुवातीला एनसीबी कस्टडीत होता, त्यानंतर आता जेलमध्ये आहे.

हेही वाचा - 'तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, हे NCB कार्यालय आहे'; एनसीबी अधिकाऱ्याने अनन्याला फटकारले

त्याच्या व्हॉट्स अॅप संवादात अभिनेत्री अनन्या पांडे हिचे नाव उघडकीस आले आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्जबाबत चर्चा झाली होती. दोघांमध्ये ड्रग्ज मागवण्याबाबत चर्चा झाली होती. याचमुळे एनसीबी अधिकाऱ्यांनी अनन्या पांडे हिला दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. तिची सुमारे सात तास चौकशी झाली आहे. यावेळी या संभाषणाबाबत चौकशी झाली. याच संभाषणामुळे आर्यन याला जामीन मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे, एनसीबी अधिकारी आता आर्यन खान, अनन्या पांडे यांचा ड्रग अँगलने तपास करत आहे.

कोणत्या खात्यावरून पैसे दिले जायचे?

आर्यन याने ड्रग्जसाठी पैसे दिल्याचे उघडकीस आल्यास त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्याने ड्रग्जसाठी पैसे दिल्याचे उघडकीस आल्यास त्याच्या विरोधात गंभीर आरोप लागू शकतो आणि त्याला जामीन मिळण्यास अडचण होऊ शकते. यामुळे आता एनसीबी अधिकारी आर्यन यांच्या बँक खात्याचा तपास करत आहेत.

आर्यन खानला न्यायालयाचा पुन्हा झटका

आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे. आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली आहे. आर्यनचा संपूर्ण कटात समावेश असल्याचा आरोप एनसीबीने केला आहे, त्यामुळे आर्थर रोड तुरुंगातील तिघांचा मुक्काम वाढला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरू असल्याचे उघडकीस आले होते. या ठिकाणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा सध्या जेलमध्ये आहे, मात्र त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हॉट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचेदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दोघांतील व्हॉट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होते, त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली.

आर्यन खान कैदी नंबर - 956

मुंबई ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानची चर्चा सगळीकडे सुरू आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान आणि गौरी खान सध्या आर्यनमुळे चिंतेत आहेत. आर्यनला आर्थर रोड येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्याचा कैदी नंबर एन 956 आहे.

आर्यनला मनी ऑर्डर

जेलमध्ये ११ ऑक्टोबरला आर्यन खानला साडे चार हजार रुपयांची मनी ऑर्डर आली होती. आर्यनला हे पैसे त्याचे वडील शाहरूख खान यांनी पाठवले आहेत. मनी ऑर्डरने आलेल्या या पैशांचा वापर आर्यन कॅन्टीनमधील जेवणासाठी करू शकतो. तसेच, तुरुंगातील नियमांनुसार कैदींना पैसे हे फक्त मनी ऑर्डरने पाठवले जाऊ शकतात आणि त्यासाठी ४ हजार ५०० रुपये ही जास्तीत जास्त रक्कम आहे. तसेच, ही रक्कम महिन्यातून एकदाच पाठवता येते. त्यामुळे, कोणत्याही कैदीच्या घरचे याहून जास्त पैसे मनी ऑर्डरद्वारे पाठवू शकत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.