ETV Bharat / city

यंदाही गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा कायम असल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ - कलाकारांवर उपासमारीची वेळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. यावर्षीदेखील मार्गदर्शक सूचना जाहीर केलेले आहेत. मात्र या सूचनांना मूर्तींकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विरोध केला आहे.

गणेशमूर्तीं कलाकार
गणेशमूर्तीं कलाकार
author img

By

Published : Jul 29, 2021, 3:23 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरे होणार असल्याचे चित्र दिसत आहे. यावर्षीदेखील गणेशमूर्तींवरील उंचीचे निर्बंध कायम आहेत. घरगुती गणपतीसाठी दोन फूट तर सार्वजनिक मंडळासाठी चार फूट अशी उंची ठरविण्यात आली आहे. या निर्बंधामुळे मूर्तिकार कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. यावर्षीदेखील मार्गदर्शक सूचना जाहीर केलेले आहेत. मात्र या सूचनांना मूर्तींकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विरोध केला आहे. याबाबत तिढा अजूनही सुटलेला नाही. यावर्षी देखील उंचीची मर्यादा कायम असल्याने मूर्तीकारांनी मोठ्या गणेशमूर्ती तयार केल्या नाहीत. परिणामी मूर्तींवर कलाकुसर करणाऱ्या अनेक कलाकारांना रोजगार मिळेनासा झाला आहे.

कलाकारांवर उपासमारीची वेळ

दरवर्षी गणेशोत्सवाच्या अगोदर बाजारपेठा आणि गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये लगबग दिसून येते. मात्र मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील निर्बंधांमुळे उत्साह दिसत नाही आहे. उंचच उंच गणेशमूर्तींचा थाट काही वेगळाच असतो. बाप्पाची उंच मूर्ती तयार झाल्यानंतर कलाकुसर करणारे कारागीर मूर्तींना जास्त आकर्षक करण्याचे काम करतात. गणेश मूर्तींचे डोळे रेखाटने, दागिने रंगवणे अशी कामे करणारे वेगळे कलाकार असतात. यंदा देखील मूर्तीबाबत नियमावली कायम असल्यामुळे मोठ्या मूर्तींची स्थापना होणार नाही आहे. यामुळे या कलाकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. गणेशोत्सवात कोट्यवधींची उलाढाल होत असते. भव्य व एकापेक्षा एक सरस उंच मूर्ती आणि मुंबई असे समीकरण असते. यंदा मात्र छोट्या मूर्तींची स्थापना केली जाणार आहे. यामुळे या मूर्तीशी निगडीत असणारे कलाकार बेरोजगार झाले आहेत. ज्या छोट्या मूर्तींचे काम मिळत आहे तेही अत्यंत कमी असल्याचे हे कलाकार सांगतात.

'सरकारने उंची मर्यादा हटवावे'

गेल्या दोन वर्षांपासून मूर्तीवरील कलाकुसर करण्याचे काम कमी झालेले आहे. यामुळे आता पहिल्यासारखे काम मिळत नाही याचे एकच कारण आहे, की मूर्तीची उंची कमी झालेली आहे. यामुळे मोठ्या मूर्तीं नाही आहेत. आता हातावर मोजता येईल एवढेच काम आम्हाला मिळत आहेत, असे कलाकार जयेश चव्हाण यांनी सांगितले. सुरुवातीला आम्ही पन्नास-साठ मूर्ती वर्षाला तयार करत होतो. मात्र गेल्या दोन वर्षापासून आम्हा कलाकुसर करणाऱ्या कलाकारांची मागणी घटली आहे. कारण छोट्या मूर्तीना कलाकुसर करायची एवढी आवश्यकता भासत नाही व जर कलाकुसर केली तर मूर्तीचा भाव वाढवावा लागतो. यामुळे यावर्षी कलाकुसर करण्यासाठी कलाकारांना बोलावणे कमी झाला आहे. या वर्षी तरी राज्य सरकारने मूर्तिकारांना उंच मूर्तींची परवानगी द्यावी, अशी मागणी राजेश मोरे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.