पुणे :- पुण्याचं वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. 54 वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे रंगमंदिर उभे राहिले. 2018 साली मुरलीधर मोहोळ स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आणि अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही केली. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालावधीत हा विषय बाजूला राहिला होता. रंगमंदिर पाडण्यास काहींनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे पुनर्विकासासाठी महापालिका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली.आणि अखेर बालगंधर्व पडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून याला कलाकारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
सध्याचे बालगंधर्व रंगमंदिर साडेबावीस हजार चौरस फूट जागेवर असेल. यात मूळ वास्तू पाडून साडेतीन लाख चौरस फुटांचे रंगमंदिर बांधण्यात येईल. नव्या वास्तूत 800 ते 900 दुचाकी आणि 350 चारचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था असेल. यात एक हजार, पाचशे आणि तीनशे अशा आसनक्षमतेची तीन नाटय़गृहे असणार आहे.