ETV Bharat / city

Historical Artillery Sion : ऐतिहासिक घटनांचा साक्षिदार राहिलेल्या तोफखान्याला अनधिकृत बांधकामाचा वेढा

सायन किल्ल्यापासून ( Sion fort ) जवळच सायन तलाव आहे. या तलावावर त्याकाळी घोडे पाणी पियायला येत असत. या तलावापासून काही अंतरावरच एक तोफखाना ( Artillery ) आहे. तोफा बाहेर काढण्यासाठी जागा, तोफ खाण्यात जाण्यासाठी जागा, बाजूने व वरून दगडी तटबंदी अशी याची रचना आहे. माहीमच्या खाडीमधून आक्रमण झाल्यास या तोफखान्यामधून सायन किल्ल्याची सुरक्षा करता यावी, अशी याची रचना करण्यात आली आहे. हा तोफखाना आता अनधिकृत बांधकामामुळे ( Unauthorized construction ) लुप्त होत आहे.

Historical Artillery Sion
Historical Artillery Sion
author img

By

Published : May 20, 2022, 7:54 PM IST

Updated : May 20, 2022, 8:02 PM IST

मुंबई - मुंबईच्या सायन येथील शिव किल्ल्यापासून काही अंतरावर ऐतिहासिक तोफ खाना आहे. या तोफ खान्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्यावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याची गरज आहे. सायन किल्ल्यापासून ( Sion fort ) जवळच सायन तलाव आहे. या तलावावर त्याकाळी घोडे पाणी पियायला येत असत. या तलावापासून काही अंतरावरच एक तोफखाना ( Artillery ) आहे. तोफा बाहेर काढण्यासाठी जागा, तोफ खाण्यात जाण्यासाठी जागा, बाजूने व वरून दगडी तटबंदी अशी याची रचना आहे. माहीमच्या खाडीमधून आक्रमण झाल्यास या तोफखान्यामधून सायन किल्ल्याची सुरक्षा करता यावी, अशी याची रचना करण्यात आली आहे. हा तोफखाना आता अनधिकृत बांधकामामुळे ( Unauthorized construction ) लुप्त होत आहे.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

तोफखान्यावर झोपड्या : मुंबई महापालिकेच्या सायन उदनचन केंद्राच्या बाजूलाच असलेल्या या तोफ खान्यावर गेल्या काही दशकात झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. झोपड्यांना पाणी पुरवठा करणारी एक मोठी पाण्याची टाकीही यावर उभारण्यात आली आहे. तोफखान्याच्या बाजूलाच झोपड्या उभ्या राहिल्याने हा तोफखाना जतन करण्यापासून वंचित राहिलेला आहे. तोफखान्यात जाणारा रस्ता लोखंडी पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत.

जतन करण्याची गरज : मुंबई महापालिकेच्या पुरातत्व वास्तू जतन विभागाकडून मुंबईतील अनेक ऐतिहासिक वास्तू आणि शिल्प जतन केली जात आहेत. यामुळे सायन येथील या तोफखान्याचे मुंबई महापालिकेच्यावतीने जतन केले जाणार आहे का याची माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधला असता या वास्तूची पालिकेकडे किंवा इतर ठिकाणी नोंद मिळत नाही. यामुळे पालिका त्याचे जतन करू शकत नाही. मात्र तो ऐतिहासिक असा तोफखाना असल्याचे समजते. या ऐतिहासिक तोफखान्याचे जतन करण्याची गरज असल्याचे पालिकेचे पुरातत्व विभागाचे अभियंता संजय सावंत यांनी सांगितले. याबाबत केंद्रिय पुरातत्व विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.

सायन किल्ला : माहीम खाडीच्या पूर्वेकडे इंग्रज अधिकारी जेरॉल्ड ओंगीयर यांनी 1670 दरम्यान सायन किल्ला बांधण्यात आला. 1925 मध्ये या किल्ल्याचा हेरिटेज 1 मध्ये समावेश करण्यात आला आहे. माहीमच्या खाडीमधून होणाऱ्या जलवाहतुकीवर लक्ष ठेवता यावे, म्हणून टेहळणीसाठी हा किल्ला बांधण्यात आला होता.

हेही वाचा - Historical Exhibition Nashik : सरकारवाड्यात शेकडो वर्ष पुरातन शस्त्र आणि वस्तूंचे प्रदर्शन

Last Updated : May 20, 2022, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.