ETV Bharat / city

शिवारात सावळागोंधळ :कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू होण्यापूर्वीच अर्ज स्वीकृती - कृषी योजना

खरीपाचे पीक शिवारात‌ उभे असताना शेतकरी पुन्हा एकदा संभ्रमात सापडला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत शेती पूरक अवजारे ५० टक्के अनुदानवर दिली जातात. यासाठी कृषी विभागामार्फत अर्ज स्वीकृती केली जाते. मात्र ही कृषी यांत्रिकीकरण योजना अजून सुरू झाली नसताना राज्यातील काही सेतू चालक या योजनेचे ऑनलाइन अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेत आहेत

महाराष्ट्र कृषी विभाग
शिवारात सावळागोंधळ :कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू होण्यापूर्वीच अर्ज स्वीकृती
author img

By

Published : Jul 31, 2020, 5:08 PM IST

मुंबई - खरीपाचे पीक शिवारात‌ उभे असताना शेतकरी पुन्हा एकदा संभ्रमात सापडला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत शेती पूरक अवजारे ५० टक्के अनुदानवर दिली जातात. यासाठी कृषी विभागामार्फत अर्ज स्वीकृती केली जाते. मात्र ही कृषी यांत्रिकीकरण योजना अजून सुरू झाली नसताना राज्यातील काही सेतू चालक या योजनेचे ऑनलाइन अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेत आहेत. मात्र ही योजना सुरुच नसल्याने केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होणार असल्याचे चित्र आहे. नवे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी या प्रकरणात अजून स्पष्टता दिली नाहीय. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनुदान तत्त्वावर पेरणी यंत्र, ट्रॅक्टर, रोटर, फवारणी यंत्र अशी अवजारे घेण्यासाठी दरवर्षी अर्ज मागवण्यात येत असतात. यामधून सोडत पद्धतीने लाभार्थी निवडले जातात. मात्र यावर्षी अजून कृषी विभागाने कृषी यांत्रिकीकरण योजना सुरुच केलेली नाही. ती कधी सुरू होणार याबाबत मंत्रालय स्तरावर काहीही जाहीर झाले नसल्याचे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे.

आदेश नसताना जे अर्ज केले जात आहेत, त्यांची दखल कृषी विभाग घेणार नसताना शेतकऱ्यांना या लाभाच्या योजनांचा लाभ तर मिळणार नाहीच; मात्र आर्थिक फटका बसणार आहे. सेतू चालक यासाठी कागदपत्र जमा करून घेत आहेत. यासाठी पैसेही घेत आहेत. मात्र अजून योजना सुरू करण्यात आलेली नाही. ग्रामीण भागात सेतू कार्यालयांच्या माध्यमातून अनेक मेसेज शेतकऱ्यांसाठी व्हायरल केले जात असून अनेक शेतकऱ्यांनी पैसे देऊन अर्ज भरल्याची उदाहरणं आहेत.

कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची अजून सरुवात झाली नसताना काही सेतू सुविधा केंद्रांत शेतकऱ्यांच्या विविध लाभाच्या योजनांसाठी अर्ज भरून घेतले जात आहेत.

योजना पूर्वीचे 'हे' ऑनलाइन अर्ज होणार बाद - कृषी अधिकारी

संचालक कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसाहाय्य योजनेत अर्जही भरून घेत आहेत. परंतु कृषी विभागामार्फत फक्त योजनेचे पोर्टल लाँच केलेला आहे. कोणतेही टार्गेट नाही. त्यामुळे अर्ज भरून घेऊ नये. सीएससी केंद्र चालकांना स्पष्ट निर्देश असून जर शेतकऱ्यांनी अर्ज केला, तर तो बाद होतो. त्याचे पैसे परत मिळत नाहीत. याला सर्वस्वी सीएससी सेंटर जबाबदार राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तशी कल्पना सीएससी आणि शेतकऱ्यांना देण्यात यावी असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांमध्ये व्हायरल झालेल्या मेसेजचा नमुना
सर्व शेतकरी बांधवांना खुशखबर आपण आतुरतेने वाट बघत असलेल्या शासकीय योजनांचा शुभारंभ झालेला आहे या योजनेमध्ये
*फलोत्पादन योजना अंतर्गत*
👉 कांदा चाळ
👉 पॅक हाऊस
👉जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन
👉फळबागांना आकार देणे
👉 फळबाग लागवड
👉 मधुमक्षिकापालन
👉 हरितगृह
👉शेडनेट हाऊस
👉प्लास्टिक मल्चिंग
तसेच
*भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत*
👉 आंबा लागवड
👉डाळिंब लागवड
👉मोसंबी लागवड
👉पेरू लागवड
👉सिताफळ लागवड
👉तसेच इतर फळबाग लागवड योजना
👉शेततळ्यातील पन्नी
👉 सामायिक शेततळे
तसेच
*कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत*
👉ट्रॅक्टर
👉 ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे
👉प्रक्रिया संच
👉पावर टिलर
👉बैलचलित अवजारे
👉 मनुष्य अवजारे
👉स्वयंचलित अवजारे
👉 कल्टीवेटर
👉कापणी यंत्र
👉नांगर
👉पेरणी यंत्र
👉मल्चिंग यंत्र
👉मळणी यंत्र
👉रोटावेटर
👉 वखर
वरील योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे
👉सातबारा
👉8अ
👉आधार कार्ड
👉पासबुक
👉कास्ट सर्टिफिकेट (फक्त एससी-एसटी साठी)

*💥ज्यांच्या नावाने फॉर्म भरणे आहे ती व्यक्ती आधार कार्ड सह स्वतः हजर असणे आवश्यक आहे , जर आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक जोडलेला असेल तर तो मोबाईल सोबत घेऊन आल्यास अर्जदार सोबत न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.