ETV Bharat / city

कांजूरमार्गची जागा नेमकी कुणाची? मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित जागेवर आणखी एकाचा मालकी दावा

author img

By

Published : May 7, 2021, 3:30 PM IST

Updated : May 7, 2021, 3:42 PM IST

कांजुरमार्गच्या 1600 एकर जागेवर केंद्र सरकार, राज्य सरकार, गरूडिया बिल्डर असे 10 ते15 जणांनी मालकी हक्क सांगितला आहे. त्यात आता आणखी एका मालकी हक्काच्या दाव्याची भर पडली आहे.

Kanjurmarg Metro CarShed
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड

मुंबई - मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सिपझ) कारशेडच्या जागेचा तिढा सुटता सुटत नसताना हा तिढा आणखी वाढत चालला आहे. कारण कांजुरमार्गच्या 1600 एकर जागेवर केंद्र सरकार, राज्य सरकार, गरूडिया बिल्डर असे 10 ते15 जणांनी मालकी हक्क सांगितला आहे. त्यात आता आणखी एका मालकी हक्काच्या दाव्याची भर पडली आहे. राजेश रमणिकलाल खताडिया नावाच्या एका व्यक्तीने या जागेवर मालकी दावा केल्याची माहिती पर्यावरण प्रेमी झोरू बाथेना यांनी दिली आहे. असे किती दावे येणार आणि कांजूरचा वाद किती दिवस सुरू राहणार असा प्रश्न ही उपस्थित केला आहे.

माहिती देताना पर्यावरण प्रेमी झोरू बाथेना

'यामुळे' कांजुरच्या जागेवरून वाद

मुंबईकरांच्या सुकर प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून भुयारी मेट्रो 3 प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पातील कारशेड आरे जंगलातील जागेत उभारण्यात येणार होते. मात्र याला पर्यावरण प्रेमी आणि आदिवासी बांधवांनी जोरदार विरोध केला. हा विरोध पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी कारशेड आरेतुन कांजूरमार्ग येथील मेट्रो 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) च्या कारशेड जागेवर हलवले. हा निर्णय जाहीर झाल्याबरोबर नव्या वादाला सुरुवात झाली. भाजपने त्यातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कांजुरमध्ये कारशेड हलवण्यास विरोध केला. पण या विरोधाला न जुमानता ठाकरे सरकारने कारशेडच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर केंद्र सरकारने ही जागा आपल्या मालकीची असल्याचे म्हणत काम बंद करण्याचे आदेश दिले. पण या आदेशाला ही जुमानता आणि ही जागा आपली, राज्य सरकारच्या मालकीची असल्याचे म्हणत काम सुरूच ठेवले. एमएमआरडीए आणि सरकारच्या या भूमिकेनंतर मात्र केंद्र सरकार पेटून उठले. त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केला. दरम्यान यावर सुनावणी सुरू असून सद्या न्यायालयाने कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मेट्रो 3, मेट्रो 6 आणि इतर दोन मार्गाचे ही काम रखडले आहे.

हेही वाचा - पप्पांनी, केंद्राकडे तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

दाव्यावर दावे

पूर्व द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूने मोठ्या संख्येने मिठागराची जागा आहे. ही जागा साधारणतः 100 वर्षापूर्वी मिठागराच्या शेतीसाठी काही लोकांना देण्यात आली होती. यासंबंधीचा करार संपल्यानंतर ही जागा नियमानुसार राज्य सरकार च्या ताब्यात आली असून आता त्यावर त्यांची मालकी आहे. असा दावा खुद्द राज्य सरकारने केला आहे. पण केंद्र सरकार मात्र ही जागा आपली असल्याचे सांगत आहे. तशी याचिका ही केंद्राने उच्च न्यायालयात केली आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात मालकी हक्कावरून वाद असतानाच गरूडिया बिल्डरने 1600 एकर जागेवर आपला हक्क दाखवला आहे. तर शापुरजी पालनजी बिल्डर आणि अन्य काही जणांनी ही यावर मालकी दाखवल्याची माहिती बाथेना यांनी दिली आहे.

आता 'हा' नवा मालक?

बाथेना यांच्या म्हणण्यानुसार, कांजूरच्या जागेवर 10 ते 15 जणांनी दावा केला आहे. यातील कित्येक दावे खोटे असून याचे पुरावे, कागदपत्रे आम्ही वेळोवेळी सार्वजनिक करत त्यांची पोलखोल केली आहे. अशात आज आणखी एका नव्या दाव्याची भर पडली आहे. राजेश खताडिया नावाच्या व्यक्तीने कांजूरमधील 1600 एकर जागा आपल्या मालकीची असल्याचे जाहीर निवेदन आजच्या एका वृत्तपत्रात देत खळबळ उडवून दिली आहे. या निवेदनानुसार रामासबु चंद्रशेखरन या व्यक्तीच्या मालकीची ही जागा होती. ती आपण चंद्रशेखरन यांच्याकडून विकत घेतली आहे. तेव्हा या जागेवर आपला मालकी हक्क असल्याचेही खताडीया यांनी या निवेदनात नमूद केले आहे. बाथेना यांनी या दाव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.एकाच जागेवर इतके दावे आणि तेही मेट्रो 3 चे कारशेड हलवल्यानंतर कसे असा सवाल त्यांनी केला आहे. तर हे मोठे षड्यंत्र असू शकते अशी शक्यता ही व्यक्त केली आहे.

हेही वाचा - परसबागेसाठी भाजीपाला बियाणे किट; संचारबंदीत महिला मजुरांनाही मिळाले काम

Last Updated : May 7, 2021, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.