मुंबई संभाजी ब्रिगेड Sambhaji Brigade आणि शिवसेना आघाडीची आज घोषणा करण्यात आली आहे. भाजपने साथ सोडल्या नंतर शिवसेनेला संभाजी ब्रिगेडची साथ मिळाली आहे. या पुढच्या सगळ्या निवडणुका युती मधे लढवली जाणार आहे.Announcement of Sambhaji Brigade and Shiv Sena Alliance राज्यात झालेल्या राजकीय घडामोडी आणि सत्तांतरानंतर नवी राजकीय समीकरणे पहायला मिळत आहे. आज उद्धव ठाकरे Uddhav Thackerayयांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने आघाडीची घोषणा केली. लोकशाहीसाठी आम्ही एकत्र येत आहोत, अशी घोषणा संभाजी ब्रिगेडने केली.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा करण्यात आली, यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकाऱ्यांचे मी स्वागत करतो. आमची युती वैचारीक आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचे कारस्थान सुरु आहे. यालाच लोकशाही मानणारे लोक आता बेतालपणे बोलत आहेत. कोर्टातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय घेणारा असेल. त्यावर मी जास्त बोलणार नाही. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे असे मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
ठाकरेंनी असेही म्हटले आहे की, मला आपण एकत्र आल्याचा आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारिक युती झाली आहे. महाराष्ट्रात आज जे काही घडवलं किंवा बिघडवलं ती महाराष्ट्राची ओळख नाही. शिवरायांचा महाराष्ट्र आहे असं काही जण म्हणतात पण तसं वागत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. आमचं हिंदुत्व पटल्यानं संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे. आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू. दोन्ही पक्षांनी मतभिन्नता कुठं आहे यावर विचार करुन समन्वयानं काम करु, असंही ठाकरे म्हणाले. संघाची विचारसरणी भाजप पुढे नेत आहे का असा सवालही त्यांनी एका प्रश्नांला उत्तर देताना विचारला आहे तसेच बरे झाले शिंदे गेले, असंगाशी संग सुटला असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली