ETV Bharat / city

अनिल परब यांनी ईडीकडे मागितला 14 दिवसांचा वेळ - अनिल परबांनी ईडीकडे मागितला 14 दिवसांचा वेळ

मन्सनुसार अनिल परब यांना ईडी कार्यालयात आज (मंगळवारी) उपस्थित राहायचे होते, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. अनिल परब यांनी ईडीकडे 14 दिवसांची वेळ मागितली आहे.

अनिल परब
अनिल परब
author img

By

Published : Aug 31, 2021, 5:46 PM IST

मुंबई - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने महाविकास आघाडी सरकारच्या आणखी एका मंत्र्याला समन्स बजावला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना हा समन्स बजावण्यात आला आहे. या समन्सनुसार अनिल परब यांना ईडी कार्यालयात आज (मंगळवारी) उपस्थित राहायचे होते, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. अनिल परब यांनी ईडीकडे 14 दिवसांची वेळ मागितली आहे. सध्या वर्तमान स्थितीत काही कामांमध्ये व्यस्त असल्याकारणाने आपण उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे 14 दिवसांचा अवधी द्यावा, असे कारण त्यांनी सक्तवसुली संचालनालय दिले आहे.

राजकीय वर्तुळात एक चर्चा आहे. या चर्चेमध्ये अनिल परब यांच्याविरोधात सुडाच राजकारण विरोधीपक्ष करत आहे. काही दिवसांपूर्वी अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात ते पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देत असल्याचे दिसून आले आहे. ज्यादिवशी नारायण राणे यांना अटक झाली, त्या दिवशीची ही व्हिडीओ क्लिप आहे. नारायण राणे यांना अटक करा, असे आदेश दिल्यामुळेच अनिल परब यांच्यावर भाजपाकडून सुडाचे राजकारण केले जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा - ED Raids - जी चौकशी करायची ती करा, मात्र जिल्ह्यातील भाजपच्या लँडमाफियांची चौकशी कधी? - भावना गवळी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.