मुंबई - माजी आमदार अनिल गोटे ( Anil Gote ) यांच्याकडून आज मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police Commissioner Sanjay Pande ) यांची भेट घेण्यात आली. त्यानंतर संजय पांडे यांनी मुंबई पोलिसांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल ( Jaykumar Rawal ) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही तक्रारी यापूर्वी अनिल गोटे यांनी ईडी कार्यालयात जाऊन केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी आज मुंबई पोलिसांत ही तक्रार दाखल केल्याने देवेंद्र फडणवीस आणि जयकुमार रावल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पंजाब बॅंक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चा -
संजय पांडे यांच्याकडे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्या तपासामध्ये मदत व्हावी म्हणून मी त्यांना लाभार्थ्यांचे दोन नावे दिले आहे. सन 2014 -2015 मध्ये तसेच सन 2017 -2018 मध्ये प्रत्येकी 10 कोटी असे एकूण 20 कोटी रुपये भाजपला देणगी स्वरुपात देण्यात आले. निवडणूक आयोगाच्या कागदपत्रात याचे उल्लेख आहे. याचे पुरावे मी त्यांच्याकडे दिले आहे.
'मुंबई फेस्टीवल प्रकरणाची चौकशी व्हावी' -
दुसरे प्रकरण हे मुंबई फेस्टिवलचे आहे. सन 2018 मध्ये मुंबईमध्ये मुंबई फेस्टीवल घेण्यात आला. या साठी 90 कोटी रुपयांचा खर्च झाला, पण मुळात असे सरकारचा कोणताही कार्यक्रम नव्हता पण तत्कालीन मंत्री जयकुमार रावल यांनी स्वतःच्या अधिकारात हा फेस्टीव्हल घेतला. यासाठी एक वर्षाचे टेंडर मागविले. पण प्रत्यक्ष टेंडर देताना याची मुदत 5 वर्षासाठी वाढवली, ते बेकायदेशीर आहे. यासाठी त्यांनी आशितोष राठोड या सहव्यवस्थापकीय संचालककांकडे यांचे जबाब दारी सोपवली. पण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पद अस्तित्वात नाही, पण आशितोष राठोड या व्यक्तीला त्यांना शोधून आणले. ज्यावर नाशिकमध्ये तीन गुन्हे दाखल आहे. या काळात जे खरे एमडी होते. ते विजय वाघमारे सुट्टीवर असताना हा प्रकार घडला. याबाबत त्यांनी सचिवालयाला एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी हा गुन्हेगारी प्रकार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याचे विशेष अधिकार्याकडून चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही आयुक्ताकडे केल्याचे माहिती अनिल गोटे यांनी दिली आहे.
'फडणवीसांनी मत्र्यांला पाठीशी घातले' -
विजय गौतम या अधिकाऱ्याने ही फाईल वर्षा बंगल्यावर सायंकाळी पाच वाजता पाठवली. त्या गौतम यांची सायंकाळी सात वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदली करून टाकले. देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घातले. सभाग्रहात क्लीनचिट दिली इतकेच नव्हे, हे प्रकरण दाबून टाकले. त्यामुळे मी संजय पांडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे, यावर चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन आपल्याला आपले सरकार करून देण्यात आला आहे, अशी माहिती अनिल गोटे यांनी दिली आहे.
हेही वाचा - Goa Election Counting 2022 : मतमोजणीसाठी गोवा प्रशासन सज्ज, 'अशी' होईल मतमोजणी