ETV Bharat / city

Anil Deshmukh Against CBI : अनिल देशमुख यांची सीबीआय विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव; आज सुनावणी

author img

By

Published : Apr 6, 2022, 6:38 AM IST

Updated : Apr 6, 2022, 9:30 AM IST

अनिल देशमुख यांची 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने चौकशी करण्याकरिता ताबा मिळवला आहे. याविरोधात अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी, याकरिता अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून अर्ज करण्यात आला आहे.

Anil Deshmukh
Anil Deshmukh

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात विशेष CBI न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. आदेशामध्ये न्यायालयाच्या निर्देशानंतर नोंदवलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ताब्यात घेण्यासाठी एजन्सीने दाखल केलेल्या अर्जाला परवानगी दिली आहे. त्याविरोधात अनिल देशमुख यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांची 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने चौकशी करण्याकरिता ताबा मिळवला आहे. याविरोधात अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

  • Bombay HC to hear plea of Maharashtra former HM Anil Deshmukh today, which challenges the special CBI court’s order that allowed the central agency’s application seeking his custody in connection with an alleged corruption case pic.twitter.com/uQb5CvMSqQ

    — ANI (@ANI) April 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी - सीबीआय अधिकारी अनिल देशमुख यांना ताब्यात घेण्यात अगोदरच शुक्रवारी बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याने तीन दिवस जे जे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज त्यांना जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. अनिल देशमुख यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या प्रकरणावर देखील सीबीआय वकिलांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना सीबीआयने 4 एप्रिल रोजी अटक करून ताबा घेतला आहे. तसेच न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना 11 एप्रिल पर्यंत सीबीआय कोठडीत पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यावेळी अनिल देशमुख यांच्या संदर्भात जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावरून सीबीआय वकिलांकडून संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता अनिल देशमुख यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर सीबीआय उद्या त्यांचा अर्थर रोड जेलमधून ताबा घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण? - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

Last Updated : Apr 6, 2022, 9:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.