मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए ( Special PMLA court ) कोर्टात सुनावणी करण्यात आली. त्यावेळी अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून आज युक्तिवाद करण्यात आला. वकिलांनी तपास यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहे. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी असणाऱ्या एक ते दोन दिवस अगोदरच तपास यंत्रणा धाडी टाकत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी ( Advocate Vikdram Chaudhari ) यांनी आज न्यायालयात केला आहे.
मनी लॉंड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने मागील वर्षी नोव्हेंबर ( ED arrest Anil Deshmukh ) महिन्यात अटक केली होते. तेव्हापासून अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहे. अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी अनिल देशमुख यांच्यावतीने युक्तीवाद करीत असताना ते म्हणाले अनिल देशमुख यांचे वय 73 ( Anil Deshmukh 73 Age ) आहे. त्यांना काही शारीरिक व्याधी आहेत. 3 महिन्यांहून अधिक काळ तुरुगांत आजारी आहेत. म्हणून जामीन मागत असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री म्हणून अडकविले जात असल्याचेही अनिल देशमुखांच्या वकिलांमार्फत सांगण्यात आले.
हे प्रकरण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या वक्तव्यावर केस आधारलेली आहे. निरीक्षण असे ही आहे, की या प्रकरणात सुनावणी होण्यापूर्वी देशमुख कुटुंबियांवर रेड टाकली जाते. असा आरोपदेखील आज न्यायालयासमोर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत 14 वेगवेगळ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणानी आतापर्यंत 70 वेळा छापेमारी केली आहे. 21 एप्रिल 2021 ला पहिल्यांदा सीबीआयने प्राथमिक आरोपपत्र ( FIR ) दाखल केली आहे.
हेही वाचा-Ravi Rana Allegation Cm Thackeray : 'मी फरार झालेलो नाही, मुख्यमंत्र्यांना मला अटक करण्याची घाई'
अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून न्यायालयासमोर युक्तिवाद करण्यात आला होता. यादरम्यान अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. या प्रश्नाला उद्या ईडीकडून काय उत्तर देण्यात येणार हे महत्त्वाचे असणार आहे. उद्या या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी होणार आहे.
हेही वाचा-Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांचे पीए, पीएस आणि सचिन वाझेंची सीबीआय करणार पुन्हा चौकशी
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.