मुंबई - 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासात आज मुंबई सत्र न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींना 29 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडीची मागणी करण्यात आली होती. यापूर्वी अनिल देशमुख यांची 11 दिवस सीबीआयने चौकशी केली आहे. आज पुन्हा तीन दिवसाची सीबीआय कोठडीची मागणी वकिलांकडून करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने मागणी फेटाळून लावली आहे. अनिल देशमुख यांच्यासह इतर तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
अनिल देशमुख यांच्यासह माजी निलंबित अधिकारी सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे या अधिकार्यांची चौकशी सीबीआय करत आहे. आज या चारही आरोपींना कोठडी संपल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले हाती. सीबीआयने अनिल देशमुख यांचे सीबीआय कोठडीची मागणी केली होती. मुंबई सत्र विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडीची याचिका फेटाळली आहे. चारही आरोपींना आता 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.