मुंबई- शंभर कोटी कथित वसुली प्रकरणातील आरोपी कुंदन शिंदे ( Anil Deshmukh Private PA Kundan Shinde ) यांनी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला ( Kundan Shinde filed bail application in PMLA court ) आहे. कुंदन शिंदे हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांचे खाजगी PA होते. बार मालकांकडून अनिल देशमुख यांनी कुंदन शिंदे यांना निर्देश दिल्यानंतर हे निर्देश सचिन वझे यांना देण्यात आले होते असा आरोप आरोप पत्रामध्ये ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. 1 नोव्हेंबर पर्यंत उत्तर दाखल करण्याचे ईडीला न्यायालयाचे निर्देश दिले आहे.
1 नोव्हेंबर पर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश - ईडीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या शंभर कोटी कथित वसुली प्रकरणातील कुंदन शिंदे हे आरोपी क्रमांक 3 आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आरोपी क्रमांक 15 आहे. ज्यांना नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ईडीच्यावतीने आरोप पत्रामध्ये कुंदन शिंदे यांच्या संदर्भात असेल म्हटले आहे की, सचिन वझे यांना मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले होते. हे निर्देश अनिल देशमुख यांनी कुंदन शिंदे यांना दिले होते, असा ईडीच्या वतीने आरोप पत्रात म्हटलेले आहे. कुंदन शिंदे यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर ईडीला 1 नोव्हेंबर पर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिले आहे. त्यामुळे आता कुंदन शिंदे यांच्या जामीना संदर्भातील अर्जावर गेली काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
काय आहे प्रकरण? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे, खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.