ETV Bharat / city

Deshmukh Maliks petition to vote : देशमुख मलिकांच्या विधान परिषद निवडणुकीतील मतदान परवानगी याचिकेवर उद्या सुनावणी - अनिल देशमुख

विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी मागणाऱ्या अनिल देशमख ( Anil Deshmukh ) आणि नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या याचिकेवर ( Petition ) उद्या हायकोर्टात ( High Court ) सुनावणी होणार आहे. उद्या सकाळीच हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्याचे आदेश न्यायमूर्ती एन. जमादार यांनी दिले आहेत.

Anil Deshmukh Nawab Malik
अनिल देशमुख नवाब मलिक
author img

By

Published : Jun 15, 2022, 7:42 PM IST

मुंबई - विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी मागणाऱ्या माजी मंत्री अनिल देशमख ( Anil Deshmukh ) आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या याचिकेवर ( Petition ) उद्या हायकोर्टात ( High Court ) सुनावणी होणार आहे. उद्या सकाळीच हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्याचे आदेश न्यायमूर्ती एन. जमादार यांनी दिले आहेत. आज 38 क्रमांकावर होणारी सुनावणी दिवसभराच्या कामकाजात होईल की नाही याची साशंकता असल्यानं वकिलांच्या विनंतीवरून कोर्टाने हा निर्णय घेतला.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेच्या कारवाईनंतर जेलमध्य आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही या दोघांनी मतदानाची परवानगी मागणीऱ्या याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, कोर्टाने त्यांना परवानगी दिली नव्हती. 10 जून रोजी महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या 6 खासदारांसाठी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीत मलिक आणि देशमुख यांना मतदान करता आले नाही. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करू द्यावे म्हणून त्यांनी याचिका दाखल केली आहे. न्यायालय यावेळी तरी त्यांना मतदानाची परवानगी देते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - President Election Meet : राष्ट्रपती निवडणूक उमेदवारीसाठी शिवसेनेचा शरद पवारांना पाठिंबा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.