ETV Bharat / city

Anil Deshmukh Money Laundering Case : अनिल देशमुखांच्या पीएसह आणि सचिन वाझेंची सीबीआय करणार चौकशी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ), संजीव पलांडे , कुंदन शिंदे आणि सचिन वाजे या चौघांना सीबीआय अधिकारी घेणार ताब्यात घेणार आहेत. यासाठी सीबीयाची टीम दिल्लीहून येणार आहे. कथीत 100 कोटी वसुली प्रकरणी सीबीआय चौकशी करणार आहे.

Anil Deshmukh Money Laundering Case
Anil Deshmukh Money Laundering Case
author img

By

Published : Apr 1, 2022, 7:52 PM IST

Updated : Apr 1, 2022, 10:25 PM IST

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाजे या चौघांना सीबीआय अधिकारी ( CBI Custody Of Anil Deshmukh And Sachin Waze ) घेणार ताब्यात घेणार आहेत. यासाठी सीबीयाची टीम दिल्लीहून येणार आहे. कथीत 100 कोटी वसुली प्रकरणी सीबीआय चौकशी करणार आहे. आज सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात अनिल देशमुख यांच्या कस्टडी साठी अर्ज केला होता. त्या अर्जाला आज कोर्टाने मंजूर केले असून जेल प्रशासनाला ताबा देण्याचे निर्देश दिले आहे.

अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या - अनिल देशमुख यांचा 100 कोटी वसुली प्रकरणात चौकशी करण्यासाठी दिल्ली सीबीआर टीमने आज ताबा मिळावा, याकरिता फॅमिली कोर्टात अर्ज केला होता. आता न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांना आर्थर रोड जेलमधून चौकशी करतात दिल्लीला नेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या अनिल देशमुख, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे हे आर्थर रोड जेलमध्ये, तर सचिन वाजे तळोजा जेलमध्ये आहे. आर्थर रोड जेल आणि तळोजा जेल अधीक्षक यांना आरोपींची कस्टडी सीबीआयला देण्यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

काय आहे प्रकरण? - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

हेही वाचा - Home Minister On Raut : संजय राऊत यांची भावना योग्यच गृहमंत्री वळसे- पाटील यांच्याकडून दुजोरा

Last Updated : Apr 1, 2022, 10:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.