ETV Bharat / city

Anil Deshmukh Case : अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी - Anil Deshmukh's bail hearing

100 कोटी कथित वसुली प्रकरणात ( 100 crore alleged recovery case ) माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटकेत आहे. त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Anil Deshmukh
Anil Deshmukh
author img

By

Published : Jan 7, 2022, 10:57 AM IST

मुंबई : 100 कोटी कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांना अटक केली होती. ईडीने अटक केल्यापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये ( Anil Deshmukh lodged in Arthur Road Jail ) आहेत. अनिल देशमुख यांनी मंगळवारी (दि.04) मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर बुधवार (दि.05) रोजी सुनावणी घेण्यात आली. मात्र न्यायालयाने अनिल देशमुख यांना कुठलाही दिलासा दिला नाही. पुढील सुनावणी 7 जानेवारी रोजी ठेवण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज अनिल देशमुख यांना जामीन ( Anil Deshmukh's bail hearing ) मिळतो की हे पाहावं लागणार आहे.

अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला ( ED opposes Anil Deshmukh's bail ) आहे. अनिल देशमुख यांनी जामिनासाठी दाखल केलेला अर्ज अवैध असल्याचं ईडीने सत्र न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे. ईडीच्या म्हणण्याप्रमाणे 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना जामीन मागता येणार नाही, असे ईडीने मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

100 कोटी कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल बारा तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर, गेल्या 65 दिवसांपासून अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या पत्नीचा भाऊ यांना देखील सह आरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.

ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला फरार घोषित केले ( ED declares Rishikesh Deshmukh absconding ) आहे. या प्रकरणात एकूण 3 जणांना ईडीने फरार घोषित केले आहे. वारंवार समन्स देवून देखील अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही. याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे या करता ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती. पण याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहले होते. ज्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. तर सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.